Video : 400 ड्रोन्स अन् 40 मिसाइल; रशियाचा युक्रेवरील हल्ल्याचा व्हिडिओ एकदा पाहाच..

Video : 400 ड्रोन्स अन् 40 मिसाइल; रशियाचा युक्रेवरील हल्ल्याचा व्हिडिओ एकदा पाहाच..

Russia Attack on Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. शुक्रवारी (6 जून) रात्रभर 400 पेक्षा जास्त ड्रोन्स आणि 40 मिसाइल्सचा मारा युक्रेनवर सुरू होता. या हल्ल्यांत कमीत कमी 6 लोक ठार झाले तर 80 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार युक्रेनमधील खार्कीव्ह शहरात तीन लोकांचा मृत्यू झाला आणि 21 लोक जखमी झाले. ढिगाऱ्याखाली बरेच जण अडकल्याची शक्यता आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियावर जोरदार टीका केली. जगाच्या एकतेत फूट पाडण्याचे प्रयत्न रशियाकडून वारंवार होत आहेत. दरम्यान,या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

भारताची नक्कल..पाकिस्तानला पडली महागात, शिष्टमंडळाची अमेरिकेत झाली मोठी फजिती

झेलेन्स्की यांनी एक्सवर लिहिले की रशियाने वोलिन, ल्वीव, टर्नोपिल, कीव, सूमी, पोलटावा, खमेलनित्सकी, चेरकासी, चेर्निहिवसहीत अख्ख्या देशावरच हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 80 लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात 9 ठिकाणे सर्वाधिक नुकसानग्रस्त ठरली. यामध्ये कीव, लविवि आणि सुमी या शहरांचा समावेश आहे. रशियनांनी 400 पेक्षा जास्त ड्रोन्स आणि 40 पेक्षा जास्त मिसाइल्स डागल्या. यात 80 लोक जखमी झाले आहे तसेच आणखीही काही जण ढिगाऱ्याखाली दबले गेले असावेत असे झेलेन्स्की यांनी लिहिले आहे.

युक्रेनचा 5 रशियन हवाई तळांवर हल्ला

युक्रेनने अलीकडेच 5 रशियन हवाई तळांवर ड्रोनने हल्ला केला होता. या हल्ल्यात रशियाची अनेक महत्त्वाची लढाऊ विमाने जळून खाक झाली होती. रशियन संरक्षण मंत्रालयाने स्वतः या हल्ल्याची पुष्टी केली होती. या हल्ल्यामुळे रशियाची जगभरात नाचक्की झाली होती. ज्या S 400 सिस्टमने भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि मिसाइल हल्ले परतवून (India Pakistan War) लावले होते. त्याच सिस्टिमला रशियावरील हल्ले मात्र रोखता आले नव्हते. या हल्ल्याचा बदला घेण्याचा प्लॅन रशियाकडून आखला जात होता. अखेर दोनच दिवसांत बदला घेत युक्रेनवर मोठा हल्ला घडवून आणण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube