Download App

Pakistan Earthquake : पाकिस्तानात जमीन हादरली! मोठ्या भूकंपाचं कारण काय ?

Pakistan Earthquake : मागील काही दिवसांपासून दक्षिण आशियातील (Pakistan Earthquake) अनेक देशांत भूकंपांचे झटके बसत आहेत. भारत, नेपाळ, अफगाणिसस्तान, बांग्लादेशनंतर आता पाकिस्तानात पुन्हा एकदा जमीन हादरली आहे. पाकिस्तानात (Pakistan) आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 5.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपात कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाल्याची माहिती नाही. पाकिस्तानात याआधीही चार दिवसांपूर्वी जोरदार भूकंप झाला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जवळपास 18 किलोमीटर खोल होता. या भूकंपात कोणतेही नुकसान मात्र झाले नाही.

Pakistan : पाकिस्तान हादरला! लष्कर ए तोयबाच्या माजी कमांडरची गोळ्या झाडून हत्या

पृथ्वीच्या आतील प्लेट्स एकमेकांवर आदळल्याने भूकंप होतो. पृथ्वी 12 टेक्टोनिक प्लेट्सवर वसलेली आहे. या प्लेट्स एकमेकांना आदळल्यास जी ऊर्जा बाहेर पडते त्यालाच भूकंप असे म्हणतात. या प्लेट्स भूगर्भात अत्यंत कमी गतीने सरकत असतात. वर्षाच्या हिशोबात सांगायचे झाले तर या प्लेट्स दरवर्षी त्यांच्या जागेवरून 4 ते 5 मिमी सरकरतात. या काळात हालचाली होताना प्लेट्स एकमेकांवर आदळण्याचे प्रकारही घडतात. असे जर झाले तर आपल्याकडे भूकंप येतो, असे तज्ज्ञ सांगतात.

Nepal Earthquake : नेपाळमध्ये शक्तिशाली भूकंप! 129 जणांचा मृत्यू, भारतातही हादरे

भारतातही जमीन हादरली

याआधी नेपाळ आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. दिल्ली एनसीआरसह उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भूकंप झाला. येथील नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. या भूकंपात मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. दिल्ली एनसीआरमध्ये 60 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवत होते असे येथील नागरिकांनी सांगितले. भारतात याआधीही भूकंप झाला. मात्र या भुकंपात कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात दोन हजारांपेक्षा जास्त लोक ठार झाले होते. त्यानंतर आता नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 129 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

Tags

follow us