Download App

पाकिस्तान घाबरला! डिफेन्स बजेटमध्ये वाढ करण्याची घोषणा; म्हणाला, आपला शेजारी खूप खतरनाक..

शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी डिफेन्स बजेटमध्ये वाढीची घोषणा करत सांगितले की आपला शेजारी (भारत) खूप खतरनाक आहे.

Pakistan Defence Budget : भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानला चांगलीच धडकी (Pakistan Defence Budget) भरली आहे. या एकाच हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची काय लायकी आहे हे जगासमोर आलं आहे. आता टरकलेल्या पाकिस्तानने भारताला घाबरून आणखी एक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून नवीन कर्ज (Operation Sindoor) मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने आपल्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहबाज सरकारमधील योजना मंत्री अहसान इकबाल यांनी डिफेन्स बजेटमध्ये वाढीची घोषणा करत सांगितले की आपला शेजारी (भारत) खूप खतरनाक आहे.

पुलवामा हल्ल्यानंतरची सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील एअर स्ट्राईक या घटना दोन्ही देशांतील तणावाचे पुरावे आहेत. आपला शेजारी देश खूप खतरनाक आहे त्याने आपल्यावर रात्रीच्या वेळी हल्ले केले हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळेच सरकारने संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री अहसान इकबाल यांनी सांगितले.

सिंध, बलुचिस्तान अन् गिलगिट बाल्टिस्तान..पाकिस्तानचे किती तुकडे होणार?

संरक्षणावरील खर्चात वाढ करण्याची योजना फक्त सैन्य दृष्टीकोनातून नाही तर राजकीय आणि सामाजक स्थिरतेसाठीही आवश्यक आहे. आपल्या सशस्त्र दलांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी जे काही आवश्यक असेल ते आपण दिलं पाहिजे हेच आपलं कर्तव्य आहे असे मंत्री इकबाल यांनी सांगितलं. याआधी घोषणा करण्यात आली होती की सरकार बजेट 2 जून रोजी सादर करील. परंतु, आता बजेट 10 जूनला सादर होणार असल्याची माहिती आहे. आयएमएफच्या दबावानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या परदेश दौऱ्यामुळे बजेटला विलंब होत असल्याचा हवाला मंत्री इकबाल यांनी दिला.

पाकिस्तानकडे पैशांचा दुष्काळ

सरकारकडे एक ट्रिलियन रुपयांचे विकास बजेट आहे. परंतु, तीन ट्रिलियन रुपयांची आवश्यकता आहे. याचा परिणाम इन्फ्रास्ट्रक्चर आणि सामाजिक विकासावर होणार आहे. पैशांच्या कमतरतेमुळे कमी प्राधान्याच्या योजना स्थगित केल्या जाणार आहेत आणि सर्वोच्च प्राधान्य असणाऱ्या योजनाच पूर्ण करण्याचा पाकिस्तान सरकारचा मानस आहे.

नव्या सिंध देशासाठी जनतेचा विद्रोह

आता तर सिंध प्रांतातही विद्रोहाचे स्वर कठोर होऊ लागले आहेत. सिंधमधील राष्ट्रवादी गट आणि येथील लोकांनी पाकिस्तानवर मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. तसेच सिंधच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरली आहे. सिंधू देशाच्या मागणीसाठीच काही दिवसांपूर्वी येथे आंदोलन झाले होते. तुरुंगात असलेल्या सिंधी नागरिकांच्या सुटकेची मागणीही यावेळी करण्यात आली.

सिंध प्रांतात जय सिंध फ्रीडम मुव्हमेंट नावाच्या संघटनेने पाकिस्तानच्या ताब्यातून स्वतंत्र होण्याची मागणी केली आहे. सिंध देशाची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी लोकांवर चुकीचे आरोप ठेऊन त्यांना तुरुंगात टाकण्यात आल्याचा आरोप संघटनेशी संबंधित लोकांनी पाकिस्तान सरकारवर केला आहे. या लोकांवर तुरुंगात अनन्वित अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे या राष्ट्रवादी लोकांना जर लवकरात लवकर मुक्त केले नाही तर पूर्ण सिंध प्रांतात मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

बांग्लादेशात युनूस यांची खुर्ची पक्की, इमर्जन्सी बैठकीत शिक्कामोर्तब; अंतरिम सरकार तुर्तास स्थिर..

follow us