Amercia News : बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या एका भारतीयाच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. या भारतीय नागरिकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा आता शोध घेतला जात आहे. फेडरल पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की मृतदेह भारताच्या ताब्यात दिला जाणार आहे. जसपाल सिंग असे मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव आहे. युएस इमिग्रेशन अँड कस्टम एन्फर्समेंत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. मृताच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आले आहे.
अटलांटा येथील रुग्णालयात 15 एप्रिल रोजी जसपाल सिंह यांचे निधन झाले. मृत जसपाल सिंग यांनी सन 1992 मध्ये पहिल्यांदा कायदेशीर पद्धतीने अमेरिकेत प्रवेश केला होता. यानंतर 21 जानेवारी 1998 रोजी न्यायालयाने त्यांना अमेरिका सोडण्याचे आदेश दिले होते. यानंतर जसपाल सिंग पुन्हा भारतात आले होते.
चीनला दणका! अमेरिका TikTok बंदीच्या तयारीत; भडकलेल्या चीनचाही पलटवार
29 जून 2003 रोजी जसपाल सिंग यांनी बेकायेशीररित्या अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु अमेरिका मेक्सिको सीमेवर त्यांना अधिकाऱ्यांनी पकडले. बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश केल्याप्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना अन्य विभागाच्या ताब्यात दिले होते. त्यांना अटलांटा डीटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
ज्यावेळी अमेरिकेतील एखाद्या डीटेन्शन सेंटरमध्ये एखाद्या विदेशी नागरिकाचा मृत्यू होतो तेव्हा या घटनेची माहिती दोन दिवसांच्या आत संसद, एनजीओ आणि प्रसारमाध्यमांना दोन दिवसात द्यावी लागते. याशिवाय संबंधित व्यक्तीचा अधिक तपशील वेबसाईटवर अपलोड केला जातो.
दरम्यान, याआधी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका रॅलीत म्हणाले होते, की स्थलांतरीतांकडून होणाऱ्या गुन्ह्यांत एकाही अमेरिकन व्यक्तीचा मृत्यू होता कामा नये. अमेरिका आणि मेक्सिको बॉर्डरवरील परिस्थितीवर जोर देत ट्रम्प म्हणाले की आम्ही येथील परिस्थिती पुन्हा ठीक करणार आहोत. देशावर होणारे आक्रमण रोखणे आणि अवैध स्थलांतरीत प्रवाशांना पु्न्हा त्यांच्या देशात पाठविण्याचे काम आम्ही करणार आहोत.