Download App

Video : “माझं शरीर कमकुवत होतंय आता मी..” हमासच्या भुयारातील इस्त्रायली कैद्याचे अखेरचे शब्द

व्हिडिओत एक इस्त्रायली कैदी (Israel News) दिसत आहे जो एका भूमिगत सुरुंगात स्वतःची कबर खोदताना दिसत आहे.

Israel News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक इस्त्रायली कैदी (Israel News) दिसत आहे जो एका भूमिगत सुरुंगात स्वतःची कबर खोदताना दिसत आहे. पॅलेस्टीनी समुहाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. युद्धग्रस्त भागातील लोक, कैदींचे कसे हाल होत आहेत हेच या व्हिडिओतून निदर्शनास येत आहे. एव्यातार डेविड असे या कैद्याचे नाव आहे. मी आता माझी स्वतःची कबर स्वतःच्याच हाताने खोदत आहे असे शब्द डेविड बोलत आहे. पॅलेस्टिनी समुहाने मागील 48 तासात प्रसारीत केलेला हा डेव्हिडचा दुसरा व्हिडिओ आहे.

भारताकडून मिळालेला पैसा जाणार अमेरिकी नागरिकांच्या खिशात; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी आयडीया..

व्हिडिओत नेमकं काय?

या व्हिडिओत डेव्हिडचे शरीर अतिशय कमकुवत झाल्याचं दिसत आहे. मोठ्या मुश्किलीने त्याच्या तोंडातून शब्द फुटतात. एक भूमिगत भुयारासारख्या दिसणाऱ्या जागेत तो खोदकाम करत आहे. डेव्हिड कॅमेऱ्यासमोर मंद आवाजात त्याची आपबिती सांगत आहे. हिब्रू भाषेत डेव्हिड म्हणतो की, मी जेव्हा माझीच कबर खोदत आहे त्यावेळी प्रत्येक दिवशी माझं शरीर अधिकाधिक कमकुवत होत आहे. मी आता थेट माझी कबर खोदत आहे. ही तीच कबर असेल जिथे मला पुरलं जाईल. स्वतंत्र होऊन आपल्या कु्टुंबासह आयुष्य व्यतित करण्याची वेळ आता निघून चालली आहे. असे म्हणताच डेव्हिडच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.

डेव्हिडच्या कुटुंबाने हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची परवानगी दिली आहे. एका दुष्प्रचाराच्या मोहिमेंतर्गत आमच्या मुलाला जाणूनबुजून उपाशी मारणे ही जगातील सर्वाधिक भयावह घटनांपैकी एक आहे. त्याला फक्त हमासच्या दुष्प्रचारासाठीच उपाशी ठेवलं जात आहे, असा आरोप डेव्हिडच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.

डेव्हिड हा गाझामध्ये हमास आणि त्याच्या सहकारी पॅलेस्टिनी गटांद्वारे कैद केलेल्याा 49 इस्त्रायली नागरिकांपैकी एक आहे. त्यांना 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या एका हल्ल्यादरम्यान पकडण्यात आले होते. यात इस्त्रायलचे 1219 लोक मारले गेले होते. प्रत्युत्तराच्या कारवाईत इस्त्रायलने गाझात मोठा हल्ला केला होता. या हल्ल्यात तब्बल 60 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.

मोठी बातमी! अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा

दरम्यान, हा व्हिडिओ प्रसारीत झाल्यानंतर इस्त्रायलचे पंतप्रधानांनी डेव्हिडच्या कुटु्ंबाशी चर्चा केली. सर्व बंधकांची सुटका करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले. हमास जाणूनबुजून या बंधकांना उपाशी ठेवत आहे असा आरोप पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केला. शनिवारी इस्त्रायलची राजधानी तेल अवीव शहरात हजारो इस्त्रायली नागरिकांनी रॅली काढली होती.

follow us