मोठी बातमी! अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा

Kamala Harris Political Retirement : अमेरिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. (Political) माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. सध्या अमेरिकेतील राजकीय व्यवस्था त्या पातळीवर आहे ती पाहून आता राजकारणात राहवं असं वाटत नाही. व्यवस्था मोडकळीस आली असल्याने आपण हा निर्णय घेत आहोत असं त्या म्हणाल्या आहेत.
भारत-पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झालं असतं;अमेरिका राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांचा खळबजनक दावा
कमला हॅरिस म्हणाल्या की, सध्या अमेरिकेतील व्यवस्था मोडकळीस आली आहे. अर्थात अमेरिकन लोकशाहीची मुलभूत मूल्ये इतकी मजबूत आहेत की ती येणाऱ्या आव्हानांचा सहज मुकाबला करू शकतील. मी अनेक वर्षे पदावर घालवली आहेत. त्यामुळे आता या पुढे कोणत्याही पदासाठी न लढण्याचे ठरवले आहे.
अगदी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीतही मी नाही. मी लोकांची सेवा करणे काही सोडणार नाही. मी माझे संपूर्ण जीवन लोकांच्या सेवेसाठी घालवले आहे. माझ्या कॅलिफोर्निया राज्यावर माझे प्रेम आहे. मी इथे अॅटर्नी जनरल व संसद सदस्य म्हणून काम केले आहे. आता मात्र मी कोणत्याही पदासाठी लढणार नाही.