Download App

भारताकडून मिळालेला पैसा जाणार अमेरिकी नागरिकांच्या खिशात; डोनाल्ड ट्रम्प यांची नवी आयडीया..

या टॅरिफमधून मिळणारे पैसे अमिरेकी नागरिकांना लाभांशाच्या रुपात वाटण्याचा विचार केला जात आहे.

Donald Trump News : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेत (Donald Trump) आहेत. टॅरिफचा वाद असो अथवा दोन देशांतील यु्द्ध थांबवणं असो प्रत्येक वेळी ट्रम्प क्रेडिट (India Pakistan Ceasefire) घेण्याचा प्रयत्न करतात. आताही त्यांनी एक खास योजनेचा उल्लेख केला आहे ज्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ताज्या रिपोर्टनुसार ट्रम्प सरकारने भारतासह अन्य देशांवर टॅरिफ आकारण्याची (Tariff  War) घोषणा केली आहे. या टॅरिफमधून मिळणारे पैसे अमिरेकी नागरिकांना लाभांशाच्या रुपात वाटण्याचा विचार केला जात आहे.

रॉयटर्स न्यूज एजन्सीनुसार ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ आकारण्याची घोषणा अलीकडेच केली आहे. हा टॅरिफ 1 ऑगस्टपासूनच आकारण्यात येणार होता. परंतु, सात दिवसांची आणखी वाढ देण्यात आली. यानंतर भारताकडूनही 25 टक्के टॅरिफ ट्रम्प सरकार वसूल करण्याची शक्यता आहे. भारताकडून टॅक्सच्या रुपात वसूल केलेला हा पैसा अमिरेकी नागरिकांना दिला जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी या योजनेची आणखी माहिती सध्या तरी दिलेली नाही.

Nobel Prize 2025 : युद्ध थांबवल आता ट्रम्प यांना नोबेल द्या; व्हाईट हाऊसची मोठी मागणी

कोणत्या देशावर किती टॅक्स

ट्रम्प सरकारच्या नव्या टॅरिफच्या यादीत भारता व्यतिरिक्त युरोपीय संघ आणि ब्रिटेनवर 15 टक्के, जपान 10 टक्के, दक्षिण कोरिया 5 टक्के टॅरिफ लावला आहे. भारतावर 25 टक्के टॅरिफ आकारण्यात आला आहे. साधारण 7 ऑगस्टपासून हा कर वसूल केला जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त कॅनडावर 35 टक्के, ब्राझीलवर 50 टक्के, स्वित्झर्लंड 39 टक्के, तैवानवर 20 टक्के टॅक्स आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक्झिक्यूटिव्ह ऑर्डरमध्ये ट्रम्प यांनी एकूण 69 देश तसेच युरोपीय संघाकडून येणारे साहित्यावर नवीन इम्पोर्ट टॅक्स लागू करण्याला मंजुरी दिली आहे. नवीन सिस्टिम येत्या 7 ऑगस्टपासून लागू होणार आहे. सर्वाधिक 41 टक्के टॅरिफ सीरियावर लादण्यात आल आहे. यानंतर लाओस आणि म्यानमारवर 40 टक्के तर सर्बियावर 35 टक्के टॅरिफ आकारण्यात येणार आहे.

चीनच्या बाबतीत अमेरिकेच्या हालचाली सुरू आहेत. याआधी ट्रम्प सरकारने चीनवर तब्बल 145 टक्के टॅरिफ लादण्यात आला होता. नंतर दोन्ही देशांत चर्चा सुरू झाली. त्यानंतर टॅरिफ कमी करण्यावर दोन्ही देश सहमत झाले. परंतु, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले होते की दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे अमेरिका एक मजबूत व्यापार करार करण्याच्या प्रयत्नात आहे.

मोठी बातमी! अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा

follow us