Download App

प्रेसिडन्शियल डिबेट काय? कशी होते राष्ट्राध्यक्षांची निवड? जाणून घ्या, अमेरिकेतील इलेक्शन ए टू झेड..

नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट झाली.

Presidential Debate : अमेरिकेत आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी (US President Election) सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीआधी विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात (Donald Trump) पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट गुरुवारी (Presidential Debate) झाली. दोन्ही नेत्यांनी जवळपास 75 मिनिटे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आणि वैयक्तिक टीकाही केली. यानंतर आता दुसरी डिबेट सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

अमेरिकी लोकतांत्रिक व्यवस्थेत presidential डिबेट एक महत्त्वाचा भाग मानला जातो. या चर्चेत दोन्ही उमेदवार एकमेकांच्या उणीवा नागरिकांसमोर आणण्याचा भरपूर प्रयत्न करतात. चला तर मग जाणून घेऊ या की अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक कशी होते? राष्ट्रपती निवड प्रक्रिया कशी आहे? या निवडणूक प्रक्रियेत प्रसेडेन्शियल डिबेट नक्की काय आहे? या प्रश्नांची उत्तरे मिळवू

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक कशी होते?

अमेरिकी राष्ट्रपती निवडणूक भारतातील लोकसभा निवडणुकीपेक्षा खूप वेगळी आहे. भारतात राजकीय पक्ष निवडणूक बहुमत मिळवण्याचा प्रयत्न करतात. बहुमत असणाऱ्या पक्षाचे खासदार आपला नेता निवडतात. हा निवडलेला नेता पुढे पंतप्रधान बनतो. अमेरिकेत नेमके या उलट आहे. येथील रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन पक्ष राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या निवडीसाठी सुद्धा लोकांमध्ये जातात. अमेरिकेत द्विदलीय व्यवस्था आहे.

नेपाळ PM दहल यांची खुर्ची संकटात? ‘त्या’ भेटीनंतर नेपाळी राजकारणात भूकंप

टप्पा एक

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणूक चार टप्प्यात होते. पहिला टप्पा ‘प्रायमरी’ आणि ‘कॉकस’ निवडणुकीचा असतो. पक्षात असे अनेक नेते असतात ज्यांना राष्ट्रपती बनण्याची इच्छा असते. प्रत्येकाकडे वेगळे विचार असतात पण एक मत असणारे लोक एकच राजकीय पक्षांचे असू शकतात. येथेच प्रायमरी आणि कॉकस निवडीची भूमिका समोर येते. प्रायमरी निवडणुकीत सदस्य निवडणुकीत त्यांचं प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी मतदान करतात.

तर दुसरीकडे कॉकस प्रक्रियेत पक्षातील सदस्य चर्चा आणि मतदानाच्या माध्यमातून सर्वात योग्य उमेदवाराची निवड करतात. या दोन्ही निवडणुकीत जो उमेदवार विजयी होतो तो पक्षाचा उमेदवार बनतो. यानंतर राजकीय पक्षाचे उमेदवार आपापल्या पक्षातील सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पूर्ण देशात प्रचार करतात. निवडणुकीची प्रक्रिया दोन्ही पक्षांकडून उमेदवाराच्या नावांची घोषणा झाल्यानंतर सुरू होते.

टप्पा 2

या टप्प्यात राष्ट्रीय मेळाव्यांचा समावेश आहे. संमेलनात राष्ट्रपतिपदाचा उमेदवार उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडतो. मतदानाच्या सहा आठवड्यांआधी दोन्ही उमेदवारांमध्ये टिव्हीवर तीन वेळेस डिबेट होते. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात पहिली डिबेट 27 जून रोजी आयोजित करण्यात आली होती. अजून दोन डिबेट बाकी आहेत.

टप्पा 3

या तीन डिबेट पूर्ण झाल्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. या टप्प्यात देशभरातील नागरिक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात. लोक ज्यावेळी मतदान करतात त्यावेळी ते अशा समुहासाठी मतदान करत असतात ज्यांना इलेक्टर असे म्हटले जाते.

टप्पा 4

चौथ्या टप्प्यात इलेक्टोरल कॉलेज असतात. अमेरिकेतील निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेज व्यवस्था अत्यंत महत्वाचा भाग आहे. हा गट 538 इलेक्टर्स निवडतात. ज्यांना 270 इलेक्टर्सचे समर्थन मिळून जाते तो देशाचा राष्ट्रपती होतो. या प्रणालीत प्रत्येक राज्याला त्याच्या प्रतिनिधित्वाच्या आधारावर एका निश्चित संख्येत इलेक्टर्स मिळतात. सर्वसाधारण निवडणुकीनंतर प्रत्येक इलेक्टर मतदान करतात. ज्या उमेदवारास 538 पैकी 270 मते मिळतात त्याला विजयी घोषित केले जाते. विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती जानेवारी 2025 मध्ये पदभार स्वीकारतील.

भारतीय वंशाच्या डॉक्टरला रिपब्लिकन पक्षात मोठा मान, डोनाल्ड ट्रम्पसाठी बजावणार महत्वाची भूमिका…

अमेरिकेची निवडणूक प्रक्रिया समजून घ्या..

राष्ट्रपती पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जवळपास दोन वर्षे लागतात. या पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना काही मूलभूत अटी पूर्ण कराव्या लागतात. उमेदवार जन्माने अमेरिकी नागरिक असला पाहिजे. वय कमीत कमी 35 वर्षे असावे. तसेच 14 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्याला असला पाहिजे. प्रायमरी आणि कॉकस या दोन प्रक्रियांच्या माध्यमातून लोक राज्य आणि राजकीय पक्षांना राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यात मदत करतात. उमेदवार निवडल्यानंतर त्यांच्या निवडीवर अंतिम शिक्कमोर्तब करण्यासाठी राजकीय पक्षांकडून राष्ट्रीय संमेलानांचे आयोजन केले जाते.

प्रत्येक चार वर्षांनी अमेरिकी नागरिक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करतात. इलेक्टोरल कॉलेज निश्चित करतात की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण असतील.

प्रेसिडेंशियल डिबेट कशी होते ?

जॉर्जियाची राजधानी अटलांटामध्ये सीएनएनच्या स्टुडिओत दोन्ही उमेदवारांत पहिली डिबेट झाली. या डिबेटला जवळपास आठ कोटी व्ह्यूज मिळाले. या डिबेटचं सूत्रसंचालन जॅक टॅपर आणि डाना बॅश यांनी केले. नियमानुसार या डिबेटमध्ये दोन्ही उमेदवार एकमेकांवर आरोप करतात. एकमेकांनी केलेल्या या आरोपांवर उत्तरेही देतात. यासाठी दोन्ही उमेदवारांना आळीपाळीने एक एक मिनिटांचा वेळ दिला जातो. तसेच या सूत्रसंचालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला जातो. डीबेट झाल्यानंतर जय पराजय निश्चित करण्यासाठी चार निकष असतात. यामध्ये मीडिया तज्ज्ञांचे मत, ओपिनियन पोलचा निकाल, सोशल मीडियाचा कल आणि व्होटिंग इंटेंशन सर्वे या निकषांचा समावेश असतो.

सध्या ट्रम्प आणि बायडेन यांच्यात नुकत्याच झालेल्या डीबेटची जोरदार चर्चा होत आहे. अमेरिकेतील बहुतांश मीडिया हाऊस आणि वृत्त वाहिन्यांनी डिबेटमध्ये ट्रम्प यांना विजयी घोषित केले आहे. सीएनएनच्या इन्स्टंट पोलमध्ये सुद्धा 67 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच विजयी मानले आहे.

चीनने चंद्रावरून आणली दोन किलो माती; 6 महिने होणार अभ्यास, अमेरिकेलाही एन्ट्री पण..

निवडणुकीत डीबेटची भूमिका नेमकी काय

टिव्हीवर होणारी ही चर्चा मागील अनेक दशकांपासून अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीची दिशा ठरविण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. मतदारांना उमेदवारांचे मूल्यांकन करण्यासाठी या चर्चेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होते. या डिबेटमध्ये असेही काही प्रसंग येतात ज्यावेळी एक उमेदवार स्वतः ला दुसऱ्यापेक्षा सरस असल्याचे दाखवू शकतो. 1987 नंतर पहिल्यांदाच उमेदवारांचा प्रचार करणाऱ्यांनी टिव्ही डिबेटवर सहमती दर्शवली.

पहिल्या डिबेटमध्ये ट्रम्प-बायडेन भिडले

पहिल्या डिबेट मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावर बायडेन यांनी पलटवार करत ट्रम्प यांच्या कार्यकाळात झालेल्या चुकीच्या कामांचा हिशोब जनतेसमोर मांडला. या डिबेटमध्ये चीनमधून येणारे नशायुक्त रसायने, वाढती महागाई, कर व्यवस्थेत श्रीमंतांना फायदा, विदेश निती, अफगाणिस्तान मुद्दा आणि युद्धावर दोन्ही उमेदवारांत जोरदार आरोप प्रत्यारोप झाले.

follow us