Download App

Russia China : चीन-रशियाकडून ‘डॉलर’ हद्दपार! द्विपक्षीय व्यापारासाठी तयार केला खास प्लॅन

Russia China Relation : रशिया आणि चीनने नुकताच एक मोठा निर्णय (Russia China Relation) घेतला आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापारात डॉलरचा वापर कायमचा बंद केला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी एका बैठकीत या निर्णयाची माहिती दिली. दोन्ही देश व्यापारात स्थानिक चलनाचा वापर करत आहेत. पाश्चिमात्य देशांकडून रशिया आणि चीन यांचे आर्थिक संबंध बाधित करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यांना यात यश मिळाले नाही. आता तर दोन्ही देशांतील व्यापारात 90 टक्के स्थानिक चलनाचा वापर केला जात आहे, असे लाव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले.

दोन्ही देशात ऊर्जा क्षेत्राव्यतिरिक्त रशियाच्या कृषी उत्पादनाची निर्यात चीनला मोठ्या प्रमाणात होत आहे. औद्योगिक आणि गुंतवणूक क्षेत्रात दोन्ही देशांच्या संयुक्त प्रकल्पांना वेगाने अंमलात आणले जात आहे. रशिया आणि युक्रेन युद्धासाठी रशियाला (Russia Ukraine War) जबाबदार धरून अमेरिकेसह अन्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी रशियाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. सध्या चीन आणि रशिया या दोन्ही देशांकडून सोन्याचा साठा वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.

Ukraine Russia War : गाढ झोपेत असतानाच ड्रोन हल्ला; सहा लोकांचा मृत्यू, युक्रेनमध्ये अलर्ट

चीन जगात सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. असे असतानाही चीनने 2022 या वर्षात एकूण 67.6 बिलियन डॉलर किमतीचे सोने खरेदी केले आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची ही सोने खरेदी ठरली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने दिलेल्या माहितीनुसार रशियाने 2023 मध्ये 324.7 टन सोन्याचे उत्पादन घेतले होते. तर चीन 374 तर सोने उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी सोने उत्पादनात 4 टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट रशियाने निश्चित केले आहे.

पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर सुद्धा रशियाच्या अर्थव्यवस्थेने 3.6 टक्के दराने वाढ नोंदवली आहे. तर 2024 या वर्षात 2.6 टक्के दराने अर्थव्यवस्था वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाश्चिमात्य देशांकडून टाकल्या जात असलेल्या निर्बंधांचा सामना करण्याची तयारी रशियाने 2013 पासूनच सुरु केली होती. अशातच ज्यावेळी युरोपने आर्थिक निर्बंधांची घोषणा केली त्यावेळी रुबल करेंसीला घसरणीपासून वाचविण्यासाठी रशियाने सोन्याच्या किमती निश्चित करून टाकल्या. या निर्णयामुळे रशियाच्या चलनातील घसरण थांबली.

Russia : रशियाचा राष्ट्राध्यक्ष कोण? तीन दिवस चालणार मतदान; पुतिन यांचं पारडं जड

follow us