Download App

पाकिस्तान घाबरला! भारताच्या नव्या संसदेत घडला ‘हा’ प्रकार

Pakistan : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenadra Modi) यांनी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील विरोधी पक्षांनी टीका करत बहिष्कार टाकला. त्यानंतर आता याच संसदेतील अखंड भारताच्या नकाशावर शेजारी देश संतापले आहेत. आधी नेपाळ आणि आता पाकिस्तानने (Pakistan) नकाशावर आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या, भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत दाखविण्यात आलेला तथाकथित अखंड भारत मध्ये पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांची भूभागही दाखविण्यात आला आहे. हे वाईट हेतून करण्यात आले असून यामुळे भारताची विस्तारवादी मानसिकता उघड होते.

Video : हवाई दलाच्या पदवीदान समारंभात अध्यक्ष बिडेन स्टेजवर पडले

या प्रकारामुळे पाकिस्तानातील शाहबाज सरकार काळजीत पडले आहे. भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे काही नेते सातत्याने अखंड भारताची चर्चा करत असतात. त्यांनी दुसऱ्या देशांबाबत द्वेष पसरवू नये. भारताने विस्तारवादी मानसिकतेऐवजी शेजारी देशांबरोबरील संबंध सुधारावेत. यामुळे दक्षिण आशियामध्ये शांती आणि स्थिरतेचे वातावरण तयार होईल.

संसदेच्या नवीन इमारतीत अखंड भारताच्या भित्तीचित्रात प्राचीन भारताचा नकाशा दाखविण्यात आला आहे. ज्यावर भारतीय राज्यांची नावे लिहीली आहेत. या म्युरल आर्टमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेश आणि भारत एकत्र दाखवले आहेत. उत्तरेकडील मनशरी तक्षशिला, वायव्येकडील पुरुषपूर आणि ईशान्येकडील कामरुमपर्यंतचे क्षेत्र यात आहे.

वाढत्या महागाईत दिलासा देणारी बातमी; गॅसच्या दरात मोठी घट

प्राचीन भारताचा विचार केला तर हा नकाशा चुकीचा वाटत नाही. त्या काळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांग्लादेश, म्यानमार, मालदीव हे देश अस्तित्वात नव्हते. या प्रकारावर नेपाळचे माजी पंतप्रधान बाबूराम भट्टराई यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यामागे भारताचा हेतू काय आहे, हे स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली होती. सध्या नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आहेत. तेव्हा त्यांनी भारताकडून याबाबत स्पष्टीकरण घेतले पाहिजे, असे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी सांगितले.

Tags

follow us