Download App

X Paid : अपना सपना मनी मनी! X वर लाईक, रिप्लाय अन् रिट्विटसाठी मोजावे लागणार 84 रूपये

X Paid : ट्विटर या म्हणजेच आताच्या एक्स (X Paid) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी एलन मस्क यांच्याकडे आल्यापासून त्यामध्ये नावापासून ते सब्सक्रिप्शनपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यात आता आणखी एक मोठा बदल झाला आहे. त्यामुळे सर्वच एक्स युझर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. नक्की काय आहे हे प्रकरण पाहूयात…

लाईक, रिप्लाय अन् रिट्विटसाठी मोजा पैसे…

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे मालक एलन मस्क यांनी एक लईव्ह स्ट्रमिंग करत एक घोषणा केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, आता एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंट उघडण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. त्यांच्या या नव्या प्रोग्रामचं नाव ‘नॉट ए बॉट’ असं आहे. सध्या हा प्रोग्राम दोनच देशांमध्ये म्हणजे न्युझीलंड आणि फिलिपाईन्समध्ये सुरू केला जाणार आहे.

NCP च्या दोन्ही गटाकडून 5 राज्यांच्या निवडणुका न लढण्याचा निर्णय, नेमकं कारणं तरी काय?

या देशांमध्ये आता एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंट उघडण्यासाठी 1 डॉलर मोजावे लागणार आहेत. ही फी युझर्सना इंटरॅक्ट करण्यासाठी द्यावी लागणार आहे. यासाठी अगोदर मोाबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागेल. त्यानंनंतर एक सब्सक्रिप्शन प्लॅन निवडावा लागणार आहे. त्यात तीन पर्याय आहेत. 1 डॉलर प्लॅन, X प्रीमियन आणि व्हेरीफाईड ऑर्गनाईजेशन

1 डॉलर प्लॅनमध्ये काय-काय असणार?

या तीन डॉलरमध्ये 1 डॉलर प्लॅन हाच सर्वात स्वस्त प्लॅन आहे. त्यात तुम्हाला एक्सच्या अनेक फिचर्सचा अक्सेस मिळणार आहे. जे अगोदर फ्री होते. यात कमेंट, पोस्ट, लाईक, रिट्विट यांसह इतर फिचर्सचा समावेश आहे. तर जे लोक फ्रिमध्ये नवं अकाऊंट उघडणार आहेत त्यांना मर्यादित अक्सेस मिळणार आहे. ते केवळ इतरांच्या पोस्ट पाहू शकतात. फॉलो करू शकतात.

Shreya Bugde : श्रेया बुगडेच्या पांढऱ्या साडीतील लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

तर सध्या असणाऱ्या अकाऊंटवर त्याचा सध्या काहीही परिणाम होणार नाही असंही मस्क यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांना हे पैसे मोजावे लागणार नाही. मात्र हे या ‘नॉट ए बॉट’ प्रोग्राम दरम्यान असणार आहे. त्यामुळे या प्रोग्रामनंतर त्यांना देखील पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तर कंपनी हे पैसे नफा कमावण्यासाठी नाही तर बनावट अकाऊंट आणि फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी आकारत आहे.

Tags

follow us