देशभरात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील (Republic Day) प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहन केले जात असून नाशिकमध्ये काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आलं. मात्र, येथील कार्यक्रमात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्या भाषणात त्यांनी घेतलं नसल्याचं सांगत वन विभागाच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. माधवी जाधव असं महिलेचं नाव असून त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत, कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता संविधानामुळे आहे. पण, जे लोकं संविधानाला कारणीभूत नाहीत, लोकशाहीला कारणीभूत नाहीत त्यांची नावं वारंवार घेतली. मात्र, जे संविधानाला कारणीभूत आहेत, प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव का घेतलं जात नाही, असं म्हणत महिला पोलीस कर्मचाऱ्याने तीव्र भावना व्यक्त केल्या. या पोलीस महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दिल्लीच्या परेडमध्ये गणपती बाप्पा! महाराष्ट्राचा चित्ररथ घडवणार गणेशोत्सवाचं दर्शन
