Republic Day : ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्कवर परेड, पाहा फोटो

Republic Day 2024 : स्वतंत्र भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) आज आपण साजरा करत आहोत. या दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी पार्क येथील ध्वजारोहण समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील हजर होते.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील जनेतला संबोधित केलं.

यावेळी त्यांनी गेल्या वर्षभरात राज्य सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना न्याय देण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कौतुक केले.

अटल सेतू, कोस्टल रोड, धारावी विकास, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्प, मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड हायवे या प्रकल्पांमुळे राज्याचा सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले

यावेळी देशाची सुरक्षा सांभाळणारे भारतीय नौदल, गोवा पोलीस, एसआरपीएफ, मुंबई पोलीस दल यांनी शानदार संचलन केलं.

याशिवाय, दंगल नियंत्रण पथक, महिला पोलिसांचे पथक, सी-60 पोलिसांचे पथक, रेल्वे पोलीस दल यांच्याही वतीने परेड करण्यात आली.
