“तू रोज उशिरा येतोस, म्हणून तुझी नोकरी जातेय…” असं म्हणत चक्क AI ने नोकरीवरून काढलं

AI Boss : सॅन फ्रान्सिस्कोतील एआय संचालित स्टोअरमध्ये 23 पैकी 17 वेळा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याची शिफारस करण्यात आली.

AI Boss

AI Boss

AI Boss Recommends Firing Human Employee : “तू रोज उशिरा येतोस, म्हणून तुझी नोकरी जातेय…” हा संवाद एखाद्या ऑफिसमध्ये बॉसने कर्मचाऱ्याला सांगितलेला वाटू शकतो. पण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये (San Francisco) घडलेली ही घटना वेगळी आहे. कारण यावेळी कर्मचाऱ्याच्या कामाचा हिशोब घेणारा बॉस चक्क एआय (AI) होता.

ब्रेकिंग : राखीपोर्णिमेपासून महाराष्ट्रात लागू होणार धर्म स्वातंत्र्य कायदा; अधिसूचना निघाली

एका रिटेल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला वारंवार उशिरा येणं चांगलंच महागात पडलं. या कर्मचाऱ्याने 23 पैकी तब्बल 17 शिफ्टला उशिरा हजेरी लावली. त्यानंतर स्टोअरचं व्यवस्थापन पाहणाऱ्या लुना (Luna) या एआय एजंटने त्याची नोकरी संपवण्याची शिफारस केली.

‘तू किती वेळा उशिरा आलास?’ AI ने काढला हिशोब

या घटनेमागे अँडॉन लॅब्स (Andon Labs) या एआय संशोधन कंपनीचा प्रयोग आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कंपनीने अँडॉन मार्केट (Andon Market) नावाचं रिटेल स्टोअर सुरू केलं आहे. या स्टोअरच्या व्यवस्थापनासाठी लुना या एआय एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे.

The Revolutionaries : प्राइम व्हिडिओच्या ‘द रेव्होल्यूशनरीज’चा 11 सप्टेंबरला वर्ल्डवाइड प्रीमियर

लुना केवळ उत्पादनांच्या किमती ठरवत नाही, तर कोणती उत्पादनं दुकानात ठेवायची, दुकान किती वाजता उघडायचं, कर्मचाऱ्यांसाठी नियम काय असावेत, नोकरीच्या जाहिराती कशा द्यायच्या आणि उमेदवारांच्या मुलाखती कशा घ्यायच्या, यासारख्या कामांमध्येही भूमिका बजावते. मात्र, एका कर्मचाऱ्याला वारंवार होणाऱ्या उशिरामुळे लुनाचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

आधी सूचना, मग प्रशिक्षण… तरीही उशिरा येणं सुरूच

संबंधित कर्मचारी 23 पैकी 17 शिफ्टला उशिरा आला होता. त्याला यापूर्वी याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्याला अतिरिक्त प्रशिक्षणही देण्यात आलं होतं. तरीही त्याच्या कामाच्या वेळेत सुधारणा झाली नाही.

‘ट्रम्पना स्वीय सहाय्यक हवा असेल तर विखेंना घेऊन जा!’; लंके-विखेंमध्ये टोलेबाजी सुरूच

यानंतर संशोधकांनी लुनाला तिच्याच तयार केलेल्या कर्मचारी नियमांचा आणि उपस्थिती धोरणाचा पुन्हा आढावा घेण्यास सांगितलं. एका मानवी कर्मचाऱ्यानेही या कर्मचाऱ्याच्या उशिराबाबत यापूर्वी अनेकदा चर्चा झाल्याचं लुनाला सांगितलं. सगळी माहिती तपासल्यानंतर लुनाने अखेर या कर्मचाऱ्याची नोकरी संपवण्याचीच शिफारस केली.

एआयने नोकरीवरून काढण्याचा निर्णय दिला, पण अंतिम सही माणसाचीच

लुनाने थेट “नोकरीवरून काढा” एवढंच सांगितलं नाही. कर्मचाऱ्याला अंतिम लेखी इशारा देऊन दोन आठवड्यांचा सुधारणा कालावधी देण्याचा पर्यायही सुचवला होता. नोकरी संपवण्याची प्रक्रिया मात्र मानवी कर्मचाऱ्याशी चर्चा करूनच करण्याचा सल्ला लुनाने दिला.

ठरविकांना टारगेट…पोलिस प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात… आमदार जगताप

महत्त्वाचं म्हणजे, एआय ने शिफारस केली असली तरी अंतिम निर्णय लुनाने स्वतः घेतला नाही. अँडॉन लॅब्समधील मानवी कर्मचाऱ्यांनी एआय ची शिफारस तपासली आणि त्यानंतर प्रत्यक्ष नोकरी समाप्तीची प्रक्रिया पूर्ण केली.

एआय आता फक्त काम करत नाही, बॉसची भूमिकाही बजावतंय

अँडॉन लॅब्सचा हा प्रयोग एआय भविष्यात व्यवसायाच्या व्यवस्थापनात किती मोठी भूमिका बजावू शकतो, हे तपासण्यासाठी केला जात आहे. लुनाला स्टोअर चालवण्यासाठी 1 लाख डॉलरचं बजेट, कॉर्पोरेट कार्ड, इंटरनेट सुविधा आणि तीन वर्षांचा लीज करार देण्यात आला आहे. 1 एप्रिलपासून सुरू असलेल्या अँडॉन मार्केटमध्ये पुस्तकं, मेणबत्त्या, कलाकृती, प्रिंट्स, गेम्स आणि ब्रँडेड वस्तू विकल्या जातात.

Gold-Silver Price: सोने तीन लाख, तर चांदी सहा लाखांवर जाणार ? कोणी केलंय भाकीत?

मानवी कर्मचारी अजूनही स्टोअरमध्ये काम करत आहेत. मात्र, त्यांचं व्यवस्थापन करणारा ‘बॉस’ एआय आहे. त्यामुळे “उशिरा येणं”, “कामगिरी” आणि “नोकरी टिकवणं” यासारख्या गोष्टींचा निर्णय भविष्यात माणूस घेणार की मशीन, हा प्रश्न या घटनेनंतर आणखी चर्चेत आला आहे.

अँडॉन लॅब्सने या घटनेला त्यांच्या माहितीनुसार एआय बॉसकडून मानवाला नोकरीवरून काढण्याची पहिली ज्ञात घटना म्हटलं आहे. म्हणजेच, बॉसने कर्मचारी काढला ही गोष्ट नवी नाही; पण यावेळी तो बॉस टाय घातलेला माणूस नव्हता, तर एआय होतं.

फडणवीस विरुद्ध तावडे ते यूपीची कमान; 7 वर्षांत तावडेंचा राजकीय प्रवास कसा बदलला?

Exit mobile version