Artificial Intelligence : बदलत्या काळातील सिव्हिल इंजीनिअरिंग: कृत्रिम बुद्धिमत्तेची नवी उंची

Artificial Intelligence : मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल इंजिनीरिंग ) भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.

Artificial Intelligence

Artificial Intelligence : मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीची (सिव्हिल इंजिनीरिंग ) भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. रस्ते, पूल, धरणे, इमारती, औद्योगिक संकुले आणि स्मार्ट शहरे यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला गती देण्याचे काम या शाखेने केले आहे. पूर्वीच्या बांधकाम उद्योगामध्ये मानवी अनुभवावर आधारित निर्णय, कागदी नकाशे आणि मॅन्युअल स्टक्चरल डिझाईन, साइट निरीक्षणासाठी प्रत्यक्ष उपस्थिती, प्रकल्प व्यवस्थापनासाठी पारंपरिक पद्धती, कामातील विलंब, बांधकाम साहित्य दरवाढ, कामगार सुरक्षेच्याA मर्यादा आणी माहितीचे कमी डिजिटल व्यवस्थापन या उद्योगातील सामान्य बाबी होत्या. या पद्धतींमुळे मोठ्या प्रकल्पांमध्ये वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांचा अपव्यय होत असे.

बदल हा जगाचा शाश्वत नियम आहे’ (Change is the only constant in this world) या उक्तीप्रमाणे मानवी संस्कृतीच्या विकासासोबत विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये सातत्याने परिवर्तन होत आले आहे. आज मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) मुळे बांधकाम क्षेत्रात मोठा बदल घडत आहे. त्याचा प्रभाव स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात पडलेला दिसून येतो. आधुनिक स्थापत्य अभियांत्रिकीने या बदलांना सकारात्मकरीत्या स्वीकारून त्यांचा प्रभावी समावेश आपल्या कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रक्रियांमध्ये केला आहे.. हा बदल केवळ तांत्रिक नसून संपूर्ण कार्यपद्धती, व्यवस्थापन आणि निर्णयप्रक्रिया बदलणारा “Paradigm Shift” आहे.

AI आधारित बांधकाम उद्योग म्हणजे काय?

AI आधारित बांधकाम उद्योगामध्ये संगणकीय बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, ड्रोन, BIM (Building Information Modeling), IoT आणि ऑटोमेशन यांचा वापर करून बांधकाम प्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि वेगवान बनवली जाते.

AI प्रणाली मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यास मदत करते. यामुळे बांधकाम क्षेत्रात प्रकल्प नियोजन, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रण, खर्च नियंत्रण आणि देखभाल यामध्ये कार्यक्षमता वाढते.

1. स्मार्ट डिझाईन आणि नियोजन : AI आधारित सॉफ्टवेअर विविध पर्यायांचे विश्लेषण करून सर्वोत्तम डिझाईन सुचवतात. यामुळे डिझाईन त्रुटी कमी होऊन बांधकाम खर्च कमी होतो व वेळेची बचत होते. BIM तंत्रज्ञानामुळे संपूर्ण इमारतीचे डिजिटल मॉडेल तयार करता येते.

2. ड्रोन आणि रोबोटिक्सचा वापर : ड्रोनच्या मदतीने साइट सर्व्हे, बांधकाम प्रकल्पाचे प्रगती निरीक्षण, सुरक्षा तपासणी तसेच अडचणीच्या ठिकाणची मापन कार्य अधिक वेगाने आणि अचूकपणे करता येते. रोबोटिक्सद्वारे विटा रचणे, काँक्रीट प्रिंटिंग आणि धोकादायक ठिकाणी काम करणे शक्य झाले आहे.

3. पूर्वानुमानाधारित देखभाल (Predictive Maintenance) : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रणाली बांधकाम यंत्रसामग्रीमधील संभाव्य बिघाड आधीच ओळखू शकतात. सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणाच्या साहाय्याने यंत्रांच्या कार्यक्षमतेवर सतत लक्ष ठेवले जाते. त्यामुळे आवश्यक देखभाल वेळेवर करता येते आणि अनपेक्षित बिघाड टाळता येतात. यामुळे बांधकाम यंत्रसामग्री (उदा. एक्स्कॅव्हेटर, क्रेन, काँक्रीट मिक्सर इ.) अचानक बंद पडण्याचे प्रमाण कमी होते, देखभाल व दुरुस्तीचा खर्च कमी होतो, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता व आयुर्मान वाढते , प्रकल्पातील विलंब कमी होऊन कामाची गती वाढते.

4. कामगार सुरक्षा सुधारणा : AI आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स कामगारांच्या हालचालींचे निरीक्षण करतात. संभाव्य अपघात ओळखून त्वरित सूचना दिली जाते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी होते.

5. प्रकल्प व्यवस्थापन व वेळेचे अनुकूलन (Project Scheduling and Time Optimization) :स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात “Time is Money” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब थेट खर्चवाढ, संसाधनांचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान यांना कारणीभूत ठरतो. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रकल्पातील संभाव्य विलंबाची कारणे ओळखून त्यावर पर्यायी उपाय सुचवते. यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होते व अनावश्यक खर्च आणि दंडात्मक शुल्क कमी होते.

6. शाश्वत आणि हरित बांधकाम :AI ऊर्जेचा वापर, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण करून पर्यावरणपूरक बांधकामाला प्रोत्साहन देते.

आव्हाने

AI तंत्रज्ञान स्वीकारताना काही अडचणी देखील आहेत:

AI-आधारित प्रणाली, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली प्रारंभिक गुंतवणूक तुलनेने जास्त असल्याने लहान आणि मध्यम बांधकाम कंपन्यांना त्याचा अवलंब करणे कठीण जाते.

AI, BIM आणि डेटा विश्लेषण साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते, ज्याचा अभाव अनेक प्रकल्पांमध्ये जाणवतो.

बांधकाम प्रकल्पांमधील मोठ्या प्रमाणावरील डिजिटल माहितीचे व्यवस्थापन करताना डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि सायबर हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो.

पारंपरिक पद्धतीने काम करणाऱ्या कामगार आणि अभियंत्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याबाबत तांत्रिक भीती किंवा प्रतिकाराची भावना आढळून येते.
ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये इंटरनेट सुविधा, डिजिटल पायाभूत व्यवस्था आणि तांत्रिक साधनांची मर्यादा असल्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आव्हानात्मक ठरते.

भारतातील परिस्थिती व संधी

भारतामध्ये स्मार्ट सिटी, मेट्रो, एक्सप्रेसवे आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांमध्ये AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. अनेक बांधकाम कंपन्या BIM, ड्रोन सर्व्हेक्षण आणि ऑटोमेशन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थापत्य अभियंत्यांसाठी करिअरच्या नवीन संधी निर्माण होत असून भविष्यात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात पुढील करिअर संधी उपलब्ध होत आहेत. BIM विशेषज्ञ (BIM Specialist): इमारती आणि पायाभूत प्रकल्पांचे डिजिटल मॉडेल तयार करणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि प्रकल्प समन्वय साधणे.

प्रकल्प डेटा विश्लेषक (Project Data Analyst): बांधकाम प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या डेटाचे विश्लेषण करून कार्यक्षमता आणि निर्णयप्रक्रिया सुधारण्यास मदत करणे.

स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर अभियंता (Smart Infrastructure Engineer): AI, IoT आणि सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करून बुद्धिमान आणि शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करणे.

ड्रोन सर्व्हे विशेषज्ञ (Drone Survey Specialist): ड्रोनच्या साहाय्याने भू-सर्वेक्षण, प्रगती निरीक्षण आणि साइट मॅपिंग करणे.

AI-आधारित प्रकल्प व्यवस्थापक (AI-enabled Project Manager): AI साधनांचा वापर करून वेळ, खर्च आणि संसाधनांचे प्रभावी व्यवस्थापन करणे.

डिजिटल कन्स्ट्रक्शन मॅनेजर (Digital Construction Manager): बांधकाम क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन करणे.
पारंपरिक बांधकाम उद्योगातून AI आधारित बांधकाम उद्योगाकडे होणारा बदल हा औद्योगिक क्रांतीसारखाच महत्त्वपूर्ण आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बांधकाम प्रक्रिया अधिक सुरक्षित, अचूक, जलद आणि शाश्वत बनत आहे.

भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे बांधकाम उद्योगाचे केवळ सहाय्यक तंत्रज्ञान राहणार नसून उद्योगाच्या परिवर्तनाचे प्रमुख केंद्रबिंदू बनेल. अशा प्रकारे, कृत्रिम बुद्धिमत्ता ही स्थापत्य अभियंत्यांची जागा घेणारी नसून त्यांच्या कार्यक्षमतेत, अचूकतेत आणि निर्णयक्षमतेत वाढ करणारी एक तांत्रिक क्रांती आहे. त्यामुळे भावी स्थापत्य अभियंत्यांनी AI, BIM, डेटा विश्लेषण आणि डिजिटल बांधकाम तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज बनली आहे.

शेअर मार्केट घोटाळा, आर्थिक तडजोड पोलीस निरीक्षकाला भोवली; गुन्हे शाखेतील राठोड निलंबित-

याचबरोबर अभियंते, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्राने या तांत्रिक परिवर्तनाचा सकारात्मक स्वीकार करून नव्या कौशल्यांचे संपादन करणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास बांधकाम उद्योग अधिक सुरक्षित, शाश्वत, कार्यक्षम आणि भविष्याभिमुख बनू शकतो.

follow us