‘पॉलिटिक्सपेक्षा पॉलिसी मेकिंगवर अधिक चर्चा’; मोदींच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंनी सांगितले बैठकीतील मुद्दे

अमोल कोल्हे म्हणाले, PM मोदींसोबतच्या भेटीत राजकारणापेक्षा पॉलिसी मेकिंग आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

Amol Kolhe on PM Modi Meeting

Amol Kolhe on PM Modi Meeting

Amol Kolhe on PM Modi Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाच्या खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत राजकीय विषयांपेक्षा मतदारसंघातील प्रश्न आणि धोरणात्मक मुद्द्यांवर अधिक चर्चा झाल्याचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सांगितले. सुमारे 20 मिनिटे पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

‘अनहॅप्पी’ असाल तर ऑफिसला येऊ नका; अनोखी रजा पॉलिसी चर्चेत, हर्ष गोयंकाही मैदानात

या भेटीत आठही लोकसभा मतदारसंघांशी संबंधित प्रश्न पंतप्रधानांसमोर मांडण्यात आले. नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प, इंद्रायणी मेडिसिटी आणि चाकण एमआयडीसीसह विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणीही करण्यात आली.

खासदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि फुले पगडी देऊन पंतप्रधान मोदींचा सन्मान केला. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. तसेच या बैठकीचा संबंध थेट एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेशी जोडणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

अन्यायावर विजयाची गर्जना… ‘दशमी’! विजय, शक्ती आणि परिवर्तनाला समर्पित चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

चाकण एमआयडीसीतील समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले

चाकण एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर कोल्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची खराब अवस्था, मोठ्या प्रमाणातील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे उद्योगांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्यांसाठी 59 कोटी रुपयांचे टेंडर निघूनही प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याचे काम होत नसल्याचा दावा त्यांनी केला. या समस्येबाबत राज्य सरकारला वारंवार पत्रव्यवहार केल्याचेही कोल्हे यांनी सांगितले. खराब रस्त्यांमुळे 19 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला.

जंतर-मंतर आंदोलनावरून संसदेत रणकंदन; अमित शाह संसदेत स्पष्टीकरण देणार?

डिलिमिटेशन विधेयकावर ‘मसुदा आधी समोर येऊ द्या’

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन विधेयकाबाबतही कोल्हे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. विधेयकाचा अंतिम मसुदा अद्याप समोर आलेला नसताना त्यावर अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. मात्र, यापूर्वीच्या मसुद्याबाबत पक्षाने घेतलेले आक्षेप कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वीचा मसुदाच पुन्हा आणला गेल्यास पक्षाची भूमिका काय असेल, हे आधीच स्पष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शरद पवारांचे सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला का? बजरंग सोनवणेंचा मोठा खुलासा

झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाबाबत बोलताना कोल्हे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थी आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत असून शिक्षण व्यवस्थेत मूलभूत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. केवळ तात्पुरत्या उपाययोजना करून प्रश्न सुटणार नाहीत, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version