हे सगळं ठरवून केल का?, अजितदादांच्या मृत्यूबद्दल मिटकरींना अनेक शंका, काय म्हणाले?

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत.

News Photo   2026 02 08T145348.297

हे सगळं ठरवून केल का?, अजितदादांच्या मृत्यूबद्दल मिटकरींना अनेक शका, काय म्हणाले?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती (Accident) मृत्यूबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेक गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र,रविवारी त्यांनी या सगळ्याचा कळस गाठत अजित पवार यांना मारण्यासाठी त्यांच्या विमानात सुसाईड बॉम्बर अर्थात आत्मघातकी बॉम्बरचा वापर झाला असावा का, अशी शंका बोलून दाखवली आहे.

इतकच नाही तर अजित पवार यांच्या विमानाचे पायलट सुमित कपूर यांना संमोहित केलं होतं का? असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मिटकरी यांनी हा खळबळजनक दावा केला आहे. अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते, त्या VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरुस्त होती, वर्षभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला देण्यात आलं. दुसरीकडं डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला होता.

अजितदादांच्या विमान प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अमोल मिटकरींची मागणी

जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला असेल अन त्याला हिप्नोटाईज केले होते का?, त्याला आमिष दाखवलं होत का? अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातो. दरम्यान, अजमल कसाब याला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवलं होतं. दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता. पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? हा मोठा प्रश्न आहे.

अशी शंका येण्याचं कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाहीये. टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं. मात्र, पायलटने ते केलं नाही. त्यामुळे आम्हाला मोठी शंका VSR कंपनीवर आहे. 50 कोटींचा विमा काढून त्यांनी पायलटला हे कृत्य करा लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली. मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचेही अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणात कुटुंबातील सदस्य म्हणून आमदार रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांच्या पत्र परिषदेकडे महाराष्ट्रसह देशाचे लक्ष आहे. मला अपेक्षा आहे 10 तारखेच्या पत्रकार परिषदमध्ये अनेक गोष्टी कव्हर होतील. जे काही पुरावे त्यांच्याकडे असतील ते सादर करतील. त्यामुळेच रोहित पवारांची पत्रकार परिषद पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, असं मला वाटते, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Exit mobile version