Asim Sarode on Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून मुंबईतील मातोश्रीबाहेर शनिवारी झालेल्या हायव्होल्टेज ड्रामानंतर आता या नोटीस बजावण्याच्या पद्धतीवरूनही चर्चा सुरू झाली आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन हे वकिलांच्या टीमसह आदित्य ठाकरे यांना 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले होते. अखेर आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी गेटवरच ही नोटीस स्वीकारली.
दिशा सालियन मृत्यू प्रकरण; आदित्य ठाकरेंसह रिहा चक्रवर्ती, डिनो मोरियाचं FIR मध्ये नाव
या संपूर्ण प्रकारावर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून कायदेशीर प्रश्न उपस्थित केला आहे.
असीम सरोदेंची पोस्ट
एखाद्या प्रकरणाची नोटीस द्यायला एखादी व्यक्ती स्वतः वकिलांचा फौजफाटा घेऊन कुणाच्या घरी जाते याला काही कायदेशीर आधार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला. महाराष्ट्रातून अनेक जण मला फोनकॉल करून असा प्रश्न विचारीत असल्याने कायदेशीर माहिती देणे आवश्यक आहे कि, क्रिमिनल केस मध्ये प्रत्यक्ष कुणाच्या घरी जाऊन नोटीस सर्व्हिस करण्याची प्रक्रिया नाही. अपवादत्मक परिस्थितीत केवळ न्यायालयाच्या परवानगीने तसे करता येते. सिव्हिल कायदा प्रक्रियेत रूल 9 A नुसार तशी दस्ती समन्स प्रक्रिया न्यायालयाचा आदेश झाल्यावर उपलब्ध आहे.
‘आदित्य ठाकरेंचा दुरान्वयेही संबंध नाही’; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊत आक्रमक
याप्रकरणी मातोश्रीवर नोटीस घेऊन जाणाऱ्यांना कायदा आदित्य ठाकरेंवर एक हत्यार म्हणून वापरायचे आहे खरे तर कायदा हे ‘साधन’ म्हणून वापरायचे असते. ‘दिशा’ चुकविली जातेय कारण ‘हंगामा खडा करना यही मकसद है!’
एखाद्या प्रकरणाची नोटीस द्यायला एखादी व्यक्ती स्वतः वकिलांचा फौजफाटा घेऊन कुणाच्या घरी जाते याला काही कायदेशीर आधार आहे का असा प्रश्न अनेकांना पडला. महाराष्ट्रातून अनेक जण मला फोनकॉल करून असा प्रश्न विचारीत असल्याने कायदेशीर माहिती देणे आवश्यक आहे. क्रिमिनल केस मध्ये प्रत्यक्ष…
— Asim Sarode (@AsimSarode) September 20, 2026
दिशा सालियान प्रकरणात ठाकरे मुख्यमंत्री असताना… राज ठाकरेंची पोस्ट अन् भाजप नेत्याचा गंभीर आरोप
अशी पोस्ट असीम सरोदे यांनी केली आहे. दरम्यान, सतीश सालियन यांच्या वकिलांनी मातोश्रीवर प्रत्यक्ष जाऊन नोटीस देण्यामागे कोणता कायदेशीर हेतू किंवा कारण सांगितले आहे, याची स्वतंत्र बाजूही या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे. मातोश्रीवर नोटीस स्वीकारण्यात आली असून त्याची पावतीही सतीश सालियन यांच्या वकिलांना देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता या नोटीसनंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने जाते, याकडे लक्ष लागले आहे.
