दिशा सालियान प्रकरणात ठाकरे मुख्यमंत्री असताना… राज ठाकरेंची पोस्ट अन् भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Disha Salian case मध्ये आदित्य ठाकरे यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आल्याने भाजप नेते प्रकाश गाडे यांनी देखील गंभीर आरोप केला आहे.
Disha Salian case BJP leader serious allegation by mention Raj Thackeray’s post : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सीबीआयने तब्बल सहा वर्षांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आल्याने राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान आता भाजप नेते प्रकाश गाडे यांनी देखील गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी राज ठाकरेंच्या पोस्टचाही उल्लेख केला आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश गाडे?
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, डीनु मोरिया, पोलीस अधिकारी आणि न्याय्य वैद्यकीय अधिकारी इत्यादीवर गुन्हा दाखल झाला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांनी कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, त्या क्लोजर रिपोर्टवर देखील कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.
मुंबई हायकोर्टाचे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या क्लोजर रिपोर्ट्स वर प्रश्न चिन्ह उपस्थित करताना म्हटले की..
– दिशा सालीयन हिने जर आत्महत्या वरून उडी मारून केली होती तर ‘तिच्या’ अंगावर कपडे का नव्हते? अंगावरून कपडे काढून आत्महत्या का करेल?
– वरून उडी मारल्यावर दिशासालीयन डोक्यातून, नाकातून रक्तस्त्राव का झाला नाही? हात पाय कशे सुरक्षित राहतील?
असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत..
साहेब आज सकाळी म्हणालेत की, तूर्तास एवढच.. त्यामुळे मी सुद्धा थांबतो.
राज ठाकरेंची पोस्ट काय?
यामध्ये साहेब म्हणजे राज ठाकरेंच्या पोस्टचा उल्लेख केला आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये ते म्हणाले की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच ! मात्र राज ठाकरे हे नेमकं कुणाल उद्देशून म्हणाले आहेत. याबाबत स्पष्टता आलेली नाही. मात्र हे वक्तव्य अमित शाहंना उद्देशून असावं अशी चर्चा आहे. कारण शाह यांनी हिंदी संमेलनात महाराष्ट्र बहुभाषिक असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे राज यांना शाहंना टोला मारायचा आहे का? अशी चर्चा आहे.
दरम्यान दुसरीकडे दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरेंचेही नाव असल्याचा दावा केला जात आहे. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली भुमिका मांडली.
काय म्हणाले राऊत?
हा अत्यंत संवेदनशील विषय असून, एका मुलीच्या चारित्र्याशी आणि तिच्या कुटुंबावर झालेल्या आघाताशी संबंधित असल्याचं राऊत यांनी म्हटलं. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी अनेकदा तपास केला असून, त्यांच्या तपासाच्या निष्पक्षतेवर शंका घेता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांनी सांगितलं की, राज्यात सध्या उद्धव ठाकरे यांचं सरकार नसून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या कार्यकाळात दिशा सालियन प्रकरणाचा तपास पूर्ण करून क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला. या तपासात आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झाल्याचा दावा राऊत यांनी केला.