अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी आम्ही महिला धोरण राबवतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

देशाला दिशा देणारी नारी आहे. तेच विचार घेऊन आपल्याला महिला धोरण राबवायचं आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

News Photo   2026 05 31T140928.770

आहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांनी आम्ही महिला धोरण राबवतोय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन

महिला धोरण हे आमचं ध्येय आहे. (Ahilyadevi Holkar) महिला सक्षमिकरण हे आमचं ध्येय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी दाखवून दिलं की महिला ही फक्त घरातील शक्ती नसून देशात आपलं स्थान निर्माण करणारी एक शक्ती आहे. देशाला दिशा देणारी नारी आहे. तेच विचार घेऊन आपल्याला महिला धोरण राबवायचं आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते चौंडी येथे आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.

आम्ही जिल्ह्याचे नामांतर केलं

राजे झाले आणि राज्यकर्ते झाले पण जनतेच्या मनावर आई म्हणून राज्य करणाऱ्या फार कमी व्यक्ती होत्या. त्यामध्ये आपल्या अहिल्यादेवी होत्या. ३०० वर्षांनंतर देखील देश अहिल्यादेवींचे कृतज्ञपणे स्मरण करतोय. अहिल्यादेवी यांनी आदर्श राज्यकारभार कसा असतो हे दाखवले. आम्ही अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर केलं. या जिल्ह्याला आम्ही अहिल्यादेवी यांचं नाव दिलं. अहिल्यानगर असं नामकरण केलं, अशी आठवण शिंदे यांनी करून दिली. तसंच चर्चा ना करता आम्ही ऑन दा स्पॉट डिसिजन घेत असतो, असंही शिंदे म्हणाले आहेत.

 मंत्रिमंडळ बैठक घेतली

आम्ही चोंडी येथे आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि मोठे निर्णय घेतले. आम्ही जे बोलतो ते करतो. चौंडी येथील विकासाचं वातावरण आपल्याला बदलायचं आहे. येथे येणारा प्रत्येक माणूस नतमस्तक होतो. एवढं हे पवित्र स्थान आहे. मुख्यमंत्री सकाळी येऊन दर्शन घेऊन गेले. मी पुन्हा एकदा सांगतो की जे जे आवश्यक आहे त्यासाठी इंचभरही त्रुटी राहू देणार नाही, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना काय?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची घोषणा केलेली आहे. त्यानुसार, 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तर नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. कुठलीही बँक असो, ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणत्याही बँकेने दिलेले दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज राज्य सरकार माफ करणार आहे.

 

 

Exit mobile version