चौंडीत होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द, चंद्रकांत पाटलांची माहिती, कधी आणि कुठे होणार बैठक?

Chandrakant Patil : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या जन्मत्रिशताब्दी निमित्त चौंडी (Choundi) येथे राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. ही बैठक 31 मे रोजी होणार होती. मात्र, आता चौंडीमध्ये होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली. चौंडी ऐवजी आता ही बैठक मुंबईत होणार असल्याचं पाटील म्हणाले.
हिंदीच काय आता उर्दूही शिका, म्हणजे अतिरेक्यांचे…; आमदार संजय गायकवाड बरळले
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी अहिल्यानगर चौंडी या त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. यामध्ये राज्य मंत्रिमंडळातील 42 मंत्री आणि त्यांचा स्टाफ उपस्थित राहणार होता. या बैठकीसाठी जोरदार तयारी देखील सुरू झाली होती. बैठकीच्या तयारीसाठी निविदाही काढण्यात आली होती. पण आता ही बैठक रद्द झाल्याची माहिती आहे. चौंडीतील बैठकी रद्द करण्यामागील अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही.
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानच्या आधीच भारताने केली क्षेपणास्त्र चाचणी…
दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने विविध उपक्रमांचे आयोजन केलेलं आहे. चौंडी येथील बैठकींच्या माध्यमातून या उपक्रमांना गती देण्याचा राज्य सरकारचा मानस होता. अहिल्यादेवी होळकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याबाबतही चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा तयार करण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आहेत.
पुण्यात 50 हजार धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम
अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यात धनगरी नाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती 31 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पुण्यात 50 हजार धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रित करणार आहोत, असं पडळकर म्हणाले.