सरकार अशा अनेक आंदोलनाला (Jarange) सामोर गेलेलं आहे. 58 मराठा मोर्चेही सरकारने पाहिले आहेत. मनोज जरांगे पाटील जर मुंबईत येत असती तर त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी रितसर परवानगी घेऊन यावं. ज्यामध्ये त्यांच्या दोन परवानग्या नाकारलेल्या आहेत. तरी ते मी दोन गाड्या घेऊन येतो असं म्हणाले आहेत. कारण, आंदोलन हे आंदोलन असंत. त्याला रितसर परवानगी, वेळ आणि काळ ठरवून दिलेला असतो. त्याला कायद्याचं बंधन असतं. त्याचा विचार जरांगे पाटील यांनी करावा अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. ते लेट्सअप मराठीवर बोलत होते.
दुसरी गोष्ट म्हणजे, मी डॉक्टरांशी बोललो आहे. त्यांच्या तब्येतीसाठी मी डॉक्टरांना काळजी घ्या असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर, आंदोलकाची काळजी सरकारने घ्यावी असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळं त्यांची तब्येत चांगली राहणं हे महत्वाचं आहे. जर तब्येत चांगली नसेल तर त्यांनी उपोषण स्थगित करावं आणि पुन्हा ते सुरू करावं असं म्हणताना आम्ही जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये असं म्हणत नाहीत. आंदोलनाचा सर्वांनाच अधिकार आहे, जो त्यांनाही आहे.
मनोज जरांगे मुंबईकडे रवाना, गाडीत बसताच अश्रू अनावर, म्हणाले, मला मारायचं तर
कायदा हा सर्वोतोपरी आहे. कायद्यापेक्षा कुणी मोठ नाही. आज कायद्याच्या चौकटीत राहून जरांगे पाटील आंदोलन करत आहेत, ते त्यांच्या मागण्यांसाठी लढत आहेत. त्यांनी ते लढलं पाहिजे असंही लाड यावेळी म्हणाले आहेत. तसंच, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कुणी काही करत असेल तर त्याच्यासोबत कसा संवाद साधायचा हेही सरकारला चांगलं माहिती आहे असा गर्भित इशाराही लाड यांनी यावेळी दिला आहे. परंतु, मला जरांगे पाटील संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन काम करतात असं वाटत नाही असंही ते म्हणाले.
जर जरांगे पाटील मुंबईत आले, आंदोलन केलं तर ते कस हाताळणार आहेत असा प्रश्न विचारला असता, लाड म्हणाले, जरांगे पाटील माझ्यासाठी आज चांगलं बोलतात, चांगलं वागतात. त्यामुळं जर त्यांच्याकडून सन्मान मिळतोय तर माझ्याकडून मिळणार आहे. बाकी, आंदोलन कसं हाताळायचं हे काम पोलीस प्रशासन आणि सरकारचं आहे. ते जरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शिव्या देत असले, टीका करत असले तरी त्यांच्याशी संवाद होणार असेल तर तो करू आणि आगे आगे देखो क्या होता है तसं पाहू काय होतं असंही लाड म्हणाले आहेत.
