रविंद्र चव्हाण; पक्षासाठी 24 तास समर्पित कार्यकर्ता कसा ठरला भाजपच्या विजयाचा शिल्पकार?

मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 पैकी 25 महानगरपालिकांवर भाजपची सत्ता. या यशामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची निर्णायक भूमिका ठळकपणे समोर येते.

6

6

Ravindra Chavan and the Strategy Behind BJP’s Maharashtra Municipal Wins: देशाच्या आर्थिक राजधानीवर परंपरागत मित्र अर्थातच उध्दव ठाकरे सोबत नसताना आणि शिवसेना शिंदे गटाचं मुंबईत फार काही अस्तित्व नसताना मिळवलेला विजय आणि त्याचसोबत महाराष्ट्रातील 29 पैकी 25 महानगरपालिकांवर भाजपची सत्ता येणं हा काही फक्त योगायोग नव्हता तर यामागे काही काळापासून असलेली मेहनत, पक्षसंघटन आणि नेतृत्व कौशल्य यांचाच तो परिपाक होता. हे यश भाजपला ज्यांच्यामुळे मिळालं त्या रविंद्र चव्हाणांना याचं श्रेय ते दिलंच पाहीजे. मात्र हे त्यांनी कसं साधलं, त्यांनी विरोधकांसह आपल्या मित्र पक्षांचंही पाणीपत कसं केलं?
मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकण्याचा दिवस हा ऐतिहासिक अक्षरात कोरला जाणार यात शंका नाही. ज्या महानगरात भाजपचा जन्म झाला, तिथं आता या पक्षाचा महापौर बसणार हे आता स्पष्ट झालं आहे. या विजयामागचे शिलेदार कोण असं जर विचारलं तर, नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या दृष्टिकोनाला आपल्या नेतृत्व कोशल्यांच्या जोरावर भक्कमपणा देत, प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच उमेदवार असल्याचं वाटावं असं सूक्ष्म नियोजन करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण. राज्यातल्या जणतेनं त्यांच्या विचारधारेला दिलेला प्रतिसाद हेच भाजपच्या यशाचं रहस्य आहे.
रविंद्र चव्हाणांनी हे कसं साध्य केलं?
भाजप हा शहरी भागातील पक्ष अशी त्याची ओळख आहे. त्याच अनुषंगानं याच शहरी मतदार वर्गाची नस ओळखण्यात रविंद्र चव्हाण यशस्वी झाले. जानेवारी 2025 मध्ये त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. राज्यात दिड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट त्यांनी मनावर घेत यशस्वीपणे पूर्णही केलं. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे भाजपला निवडणुकांत जनतेसमोर जाताना त्याची खूप मदत झाली. ही संघटनशक्तीच भाजपसाठी सर्वात मोठे शस्त्र ठरली. एक जमिनीवरील कार्यकर्ता ते पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असा 25 वर्षांचा त्यांचा अनुभव आणि प्रवास असलेल्या चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यांच्या त्या कार्यकाळात त्यांनी जोडलेली माणसं हेच आज भाजपच्या विजयासाठी निर्णायक ठरले आहेत.
महापालिका निवडणुकांचं सूक्ष्म नियोजन, उमेदवारांची योग्य निवड आणि सभांचे अचूक वेळापत्रक ही चव्हाणांची मुख्य रणनिती ठरली. सरकार आणि पक्ष संघटन यांच्यातील आदर्श समन्वय राखण्यात ते यशस्वी झाले, असं काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे. फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवला, तर रवींद्र चव्हाणांनी भाजपच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग हा मतदानासाठी बाहेर काढला.
महापालिका निवडणुकीताल विजयाची संपूर्ण आकडेवारी जेव्हा समोर आली तेव्हाच चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीची चर्चा सुरू झाली. चव्हाण आणि त्यांच्या रणनीतीची व्याप्ती अधिक स्पष्टपणे महाराष्ट्राच्या लक्षात आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मुरब्बी राजकारणी आणि नेतृत्व म्हणून रविंद्र चव्हाण यांचा उदय झाला आहे.
Exit mobile version