“Every drop of Pakistan’s water is a red line,” Sharif warns India : पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफने (Shehbaz Sharif) भारताला थेट धमकी दिली आहे. सिंधू जल करारला भारताने पहलगाम हल्यानंतर स्थगिती दिली होती. त्याच पार्श्वभुमीवर शरीफने जाहीर केले की, पाकिस्तानच्या पाण्याचा प्रत्येक थेंब ही त्यांची एक रेड लाईन आहे. जर भारताने त्यांची भुमिका बदलली नाही तर त्यांना थेट प्रत्युत्तर दिले जाईल, असे शरीफ म्हणाला.
मिमिक्री करायची असेल तर चित्रपटात जा; राहुल गांधींच्या वर्तनावर एकनाथ शिंदेंचा उपरोधिक टोला
भारत शांततेचा शत्रू…
पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी इस्लामाबादमध्ये गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी ‘यादगार-ए-फतह’ या समारंभात बोलताना शरीफने हा इशारा भारताला दिला. तसेच भविष्यात पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला किंवा सुरक्षेला भारताने आव्हान दिल्यास 2025 च्या संघर्षादरम्यान दिलेल्या प्रत्युत्तरापेक्षाही कठोर उत्तर देऊ, असे शरीफ म्हणाला. ऑपरेशन सिंदूरच्या तीन दिवसांच्या युद्धात भारताचा पराभव झाल्यानंतर भारताने एकतर्फी आणि बेकायदेशीरपणे सिंधू जल करार स्थगित केला. अशी कृती करणे म्हणजे ‘भारत शांततेचा शत्रू’ आहे, असे शरीफ म्हणाला.
चामोली बोगदा दुर्घटना: विष्णूगड-पिपलकोटी जलविद्युत प्रकल्प आहे तरी कसा ?
2025 च्या संघर्षात पाकिस्तानने आपली सार्वभौमत्व आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. तसेच देशाचे “खरे स्वरूप आणि ओळख” केवळ युद्धभूमीवरील वर्तनातूनच नाही, तर शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतूनही दिसून येते. असे शरीफ म्हणाला.
…तोपर्यंत काश्मिरी बांधवांना पाठींबा देऊ
काश्मीरबाबत बोलताना शरीफने सांगितले की, पाकिस्तानची भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे आणि इस्लामाबाद काश्मिरी जनतेच्या ‘आत्मनिर्णयाच्या अधिकारा’ला पाठिंबा देणे सुरूच ठेवेल. “आम्ही त्यांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ देणार नाही आणि जोपर्यंत आमच्या काश्मिरी बांधवांना आणि भगिनींना त्यांचा मूलभूत अधिकार मिळत नाही, तोपर्यंत भारतीय दडपशाहीतून त्यांच्या मुक्ततेसाठी राजकीय, राजनैतिक आणि नैतिक पाठिंबा देणे सुरूच ठेवू,” असे तो म्हणाला.
पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान शरीफने पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की यांच्यात नुकत्याच झालेल्या संयुक्त संरक्षण कराराचाही उल्लेख केला. या करारानुसार, या तीन देशांपैकी कोणत्याही एका देशावर झालेला सशस्त्र हल्ला हा तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल.
‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’
दरम्यान शरीफच्या ‘पाण्याचा प्रत्येक थेंब रेड लाईन’ या वक्तव्यामुळे सिंधू जल कराराचा मुद्दा आगामी काळात भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. भारताने या विषयावर घेतलेली भूमिका आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक वातावरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो.
चीनमधील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारताच्या मान्सूनवर परिणाम? पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
एकूणच, पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून शहबाज शरीफने पाण्याचा मुद्दा, काश्मीर आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबत पाकिस्तानची कठोर भूमिका कायम असल्याचे स्पष्ट केले असून, भारताकडून कोणतेही सुरक्षा किंवा सार्वभौमत्वाचे आव्हान आल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्याच्या या वक्तव्यावर आता भारत काय प्रतिक्रिया देणार याकडे लक्ष लागले आहे.
Islamabad – Pakistan Prime Minister Shehbaz Sharif has once again warned India over the Indus Waters Treaty, declaring that “every single drop” of Pakistan’s water is a red line.Speaking at an event in Islamabad, Sharif claimed that Pakistan had defeated India in May 2025 and… pic.twitter.com/JrDeV6cDmv
— NextMinute News (@nextminutenews7) August 14, 2026
