पोलीस प्रकरणाला वेगळ वळण देत आहेत; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा आरोप

Sangram Jagtap यांनी धीरज परदेशी प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत.

Sangram Jagtap

Police giving case a different turn Sangram Jagtap alleges in Dheeraj Pardeshi case : अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याची मुकुंदनगरमध्ये हल्ल्यात मृत्यू झाला. हे प्रकरण आता शहरात चांगलेच तापले होते. सोमवारी हिंदुत्ववादी संघटनेने शहर बंद पुकारला होता. त्याला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज पुन्हा पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत.

नेमकं काय म्हणाले संग्राम जगताप?

अहिल्यानगर शहारातील धीरज परदेशी हल्ल्याप्रकरणी विशेष सरकारी वकिल नियुक्त केले जावेत. ही घटना पोलीस वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रकार करत आहेत. त्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच आम्ही गृहमंत्र्यांना देखील भेटून आमच्या मागण्या मांडणार आहोत. आंदोलनामध्ये फोन करून फडणवीसांनी आमच्या भावना जाणून घेऊन आम्हाला अश्वासन दिलं. पण त्यानंतर पोलीसांनी पुन्हा त्यांची भूमिका बदलली आहे.

कंस आणि रावण मुस्लिम नव्हते; धर्मावर भाष्य करताना आदिल हुसैन यांची परखड भूमिका

मात्र आम्ही सरकारपर्यंत आमच्या भावना आणि मागण्या पोहचवणार आहोत. त्यात या आरोपींच्या अनधिकृत घरांना शासनाने नोटीस लावली. पण त्यांनी त्याला हायकोर्टातून स्टे लावला. त्यामुळे त्याचं काम करणारे मास्टरमाइंड लोक वेगळे आहेत. पोलीस जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या पिडीत कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तसेच धीरज परदेशींच्या पत्नीला शासनाच्या माध्यमातून कुठेतरी सन्मानजनक नोकरी देण्यात यावी. आमच्या हिंदुत्त्ववादी संघटना त्यांच्या पाठीमागे आहेत. आम्ही त्यांना निश्चित मोठी मदत करू.

follow us