पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान, राष्ट्रपती अन् सैन्यप्रमुखांच्या बैठका; कोण राजीनामा देणार?

Pakistan Political Crisis : पाकिस्तानच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी (Pakistan Political Crisis) घडू लागल्या आहेत. मंगळवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ, राष्ट्रपती असिफ अली जरदारी आणि सैन्य प्रमुख असीम मुनीर यांच्यातील बैठकीने देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. सोशल मीडिया आणि काही पाकिस्तानी माध्यमांच्या रिपोर्टमध्ये राष्ट्रपती जरदारी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी असीम मुनीरची नियुक्ती (Asim Munir) केली जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने (Pakistan Government) मात्र या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार मंगळवारी सर्वात आधी जनरल असीम मुनीरने पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची भेट घेतली. यानंतर काही तासांनंतर शरीफ राष्ट्रपती जरदारी यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले. या दोन्ही बैठकांतील अंतर खूप कमी होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत.
रशियाने भारताला दणका दिलाच! पाकिस्तान अन् रशिया मोठी डील, करारावर सह्या; नेमकं काय घडलं?
संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चा निराधार असल्याचे सांगितले. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता. नंतर मात्र रिपोर्ट्स काढून टाकण्यात आले. या घडामोडींची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली आहे. त्यांनी सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रपती जरदारी सध्याचे सरकार आणि राजकीय प्रक्रिये संदर्भात पूर्णपणे आश्वस्त आहेत असेही ख्वाजा असिफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सेनाप्रमुख मुनीरचा राजकारणात कोणताही हस्तक्षेप नाही. पंतप्रधान आणि सेनाप्रमुखांच्या बैठकी नेहमीच होत असतात. आठवड्यात दोन ते तीन वेळा सुरक्षा, देशांतर्गत परिस्थिती या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होत असते असेही संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी सांगितले. दरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी खरी माहिती सांगितली नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानात सध्या प्रचंड अराजकता पसरली आहे. बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढल्या आहेत. महागाई सुद्धा प्रचंड वाढली आहे. देशाचा कारभार सध्याच्या सरकारच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तानात बसवर मोठा हल्ला, हल्लेखोरांनी ओळख विचारून 9 जणांना घातल्या गोळ्या