पाकिस्तानात बसवर मोठा हल्ला, हल्लेखोरांनी ओळख विचारून 9 जणांना घातल्या गोळ्या

Pakistan News : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर (Pakistan News) आली आहे. येथे पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. रिपोर्टनुसार हल्लेखोरांनी 9 लोकांना त्यांची ओळख विचारून गोळ्या घातल्या. या बस हल्ल्यात मारले गेलेले सर्व लोक पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील (Bus Attack) आहेत. बस क्वेटाहून लाहोरला निघाली होती. बलुचिस्तानातील झोब (Baluchistan) परिसरात बस येताच बंदूकधारी हल्लेखोरांनी या बसवर हल्ला केला.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत अत्यंत अशांत आहे. येथे अशा घटना नेहमीच घडतात. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, असिस्टंट कमिश्नर झोब नावेद आलम यांनी सांगितले, की बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झोब परिसरात एक बस थांबवली. नंतर बसमधील प्रवाशांना त्यांची ओळख विचारली. नंतर या प्रवाशांवर गोळीबार करण्यात आला. सर्व प्रवासी पंजाब प्रांतातील वेगवेगळ्या शहरांतील होते. प्रवाशांचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
Pakistan Bomb Attack: पाकिस्तानध्ये लष्करी ताफा टार्गेट, आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार
या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. बलूच संघटनांनी अशा प्रकारचे हल्ले याआधीही केले आहेत. त्यामुळे हा हल्ला देखील बलूच संघटनांनीच केला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी या हल्ल्याला दहशतवादी घटना असे संबोधले. दहशतवाद्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आणि ओळख विचारुन गोळ्या घातल्या असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, याआधी मार्च महिन्यात बलूच लिबरेशन आर्मीने (Baloch Liberation Army) क्वेटाहून पेशावरला निघालेल्या जाफर एक्सप्रेस या रेल्वेचे अपहरण केले होते. या रेल्वेत 400 पेक्षा जास्त प्रवासी होते. बलूच आर्मीने प्रवाशांबरोबरच काही पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांना कैद केले होते. याच दरम्यान बातमी आहे की क्वेटा आणि मस्तुंगसह काही ठिकाणी बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला आहे. बलूच सरकारचे प्रवक्ते रिंद यांनी सांगितले की या हल्ल्यांना सुरक्षा दलांनी परतवून लावले आहे.
पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली कोण होती? जिचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळला