रशियाने भारताला दणका दिलाच! पाकिस्तान अन् रशिया मोठी डील, करारावर सह्या; नेमकं काय घडलं?

Russia Pakistan Big Deal : भारताचा मित्र म्हणून जगात ओळखल्या जाणाऱ्या रशियाने (Russia Pakistan Big Deal) एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर हा निर्णय भारताची अस्वस्थता वाढवणारा आहे. पाकिस्तान आणि रशिया (Pakistan News) या दोन देशांत एका नव्या करारावर सह्या झाल्या आहेत. रशियातील पाकिस्तानी दुतावासाने (India Russia Relation) सांगितले की पाकिस्तान आणि रशियाने कराची स्थित पाकिस्तान स्टील मिल पुन्हा सुरू करण्यासाठी एक प्रोटोकॉलवर सही केली आहे. रशियाची राजधानी मॉस्कोतील पाकिस्तानी दुतावासात हा करार करण्यात आला.
पाकिस्तानच्यावतीने या करारावर इंडस्ट्री आणि प्रोडक्शन सेक्रेटरी सैफ अंजूम यांनी तर रशियाच्यावतीने इंडस्ट्रियल इंजिनिअरींगचे LLC जनरल डायरेक्टर वादिम वेलिच्को यांनी सह्या केल्या. यावेळी दोन्ही देशांचे काही वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सचिव हारुन अख्तर खान यांनी सांगितले की रशियाच्या सहकार्याने पाकिस्तान स्टील मिल पुन्हा सुरू करणे एक मजबूत औद्योगिक भविष्याच्या प्रती आमची प्रतिबद्धता प्रदर्शित करतो. रशिया स्थित पाकिस्तानी दुतावासाने दिलेल्या माहितीनुसार कराची येथील पाकिस्तान स्टील मिल सन 1973 मध्ये सोविएत संघाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती.
रस्ते आणि रेल्वे विकासातही रशियाची मदत
पाकिस्तान आणि रशियाने या महिन्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला मध्य आशिया आणि रशियाशी जोडण्यासाठी रेल्वे आणि रस्त्यांचे नेटवर्क अधिक विकसित करण्यावर सहमती दर्शवली होती. यामुळे लँडलॉक देशांना समुद्री मार्गापर्यंत थेट जाण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, चीनच्या तियानजिनमध्ये आयोजित शांघाय सहयोग संगठनच्या मंत्रीस्तरीय संमेलनादरम्यान पाकिस्तानी मंत्री अब्दुल अलीन खान आणि रशियाचे उपमंत्री आंद्रेई सर्गेयेविच निकितिन यांची भेट झाली होती. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि आर्थिक एकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मुलभूत सोयीसुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली होती.
दरम्यान, युक्रेन युद्धामुळे अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले होते. हे निर्बंध अजूनही कायम आहेत. त्यामुळे रशियाच्या अडचणी वाढल्या होत्या. परंतु, याच काळात भारतने तेलासह अन्य वस्तू खरेदी करून रशियाला मोठा आधार दिला होता. रशियाच्या अर्थव्यवस्थेला आधार मिळाला. अमेरिकेचा विरोध पत्करून भारत अजूनही रशियाकडून तेल खरेदी करत आहे. भारत आणि रशियाची मैत्री जगात सर्वश्रुत आहे. अशात आता रशियाने पाकिस्तानशी करार केला आहे. या घडामोडींमुळे भारतावर नेमका काय परिणाम होणार याची उत्तरे लवकरच मिळतील.
भारत अन् रशियाची मैत्री खुपली! अमेरिकेत भारत-चीन विरोधात बिल सादर, 500 टक्के टॅरिफचा प्रस्ताव