माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला?, काय आहे नक्की प्रकरण?

नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं अखेर कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

News Photo   2025 12 17T214118.221

माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला?, काय आहे नक्की प्रकरण?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे (kokate) यांच्याविरोधात आज कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं होतं, त्यानंतर आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आहे. राज्याच्या राजकारणात ही मोठी खळबळ असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील हा दुसरा राजीनामा आहे. नेमक कोणत्या प्रकरणात कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला याची आता चर्चा सुरु झाली आहे.

शिक्षेला स्थगिती देण्यात यावी यासाठी माणिकराव कोकाटे यांनी आज उच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती, मात्र न्यायालयानं या प्रकरणावर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला. हाय कोर्टाकडून देखील कोकाटे यांना दिलासा मिळाला नाही. सध्या कोकाटे हे लिलावरी रुग्णालयात उपाचर घेत आहेत, दरम्यान त्यांनी दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर अखेर आता आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोकाटे यांचं मंत्रिपद काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती.

मोठी बातमी! अखेर माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा

प्रकरण काय?

1995 मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप याप्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण 1997 पासून सुरु होतं. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेलं होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश
होता.

20 फेब्रुवारी 2025 ला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयान या प्रकरणात कोकाटेंना शिक्षा सुनावत काही तासात जामीनही दिला होता. दरम्यान या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली आहे, कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा आणि 10 हजारांचा दंड ठोठावलाय. माणिकराव कोकाटेंना शिक्षा सुनावल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. कोकाटे हे आधीही रमी प्रकरणात माणिकराव कोकाटेंचं खातेबदल झालंय, मात्र, या प्रकरणात कोकाटेंना अखेर राजीनामाच द्यावा लागला आहे.

Exit mobile version