दिल्लीच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला भीषण आग; 9 प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Greater Noida Bus Fire: बुधवारी रात्री उशिरा यमुना द्रुतगती मार्गावरील एअरपोर्ट इंटरचेंजजवळ डबलडेकर स्लीपर बसला भीषण आग लागली.

Greater Noida Bus Fire

Greater Noida Bus Fire

Greater Noida Bus Fire: बुधवारी (23 सप्टेंबर) रात्री उशिरा यमुना द्रुतगती मार्गावरील एअरपोर्ट इंटरचेंजजवळ डबलडेकर स्लीपर बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत बसमध्ये अडकलेल्या नऊ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांचा समावेश असल्याची माहिती आहे.

24 सप्टेंबरचे राशिभविष्य: चंद्र कुंभ राशीत, मेष ते मीन राशींसाठी पैसा, नोकरी, आरोग्य आणि नात्यांबाबत काय आहेत संकेत?

मिळालेल्या माहितीनुसार, राज कल्पना ट्रॅव्हल्सची ही बस दिल्लीहून मोहाबाकडे जात होती. एअरपोर्ट इंटरचेंजजवळ बसच्या इंजिनच्या भागातून आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने बस एक्सप्रेसवेच्या कडेला थांबवली आणि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. चालक आणि वाहकाने प्रवाशांना तातडीने बसबाहेर पडण्याचे आवाहन केले. त्यामुळे 20 हून अधिक प्रवासी बसमधून बाहेर पडून बचावले, मात्र नऊ जणांना बाहेर पडता आले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि यमुना एक्सप्रेसवे सुरक्षा पथक घटनास्थळी पोहोचले. बस आगीने पूर्णपणे जळून खाक झाली होती. आग विझवल्यानंतरही बसमधून धूर निघत असल्याने बचावकार्य आव्हानात्मक बनले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुरक्षा पथकाला बसची बाह्य रचना कापावी लागली. जवळपास पाच तासांच्या बचावकार्यानंतर मृतदेह आणि शरीराचे अवशेष बाहेर काढण्यात आले.

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला वेग, हायकोर्टात याचिका फेटाळली, आता उर्वरित भूसंपादनावर प्रशासनाचा भर

आगीमुळे यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतुकीवरही परिणाम झाला. सुरक्षेच्या कारणास्तव जेवर टोलनाका आणि एअरपोर्ट इंटरचेंज परिसरातील वाहतूक सुमारे 30 मिनिटे थांबवण्यात आली होती. याचदरम्यान दोन वाहनांची धडकही झाली. आग पूर्णपणे विझवल्यानंतर आणि बचावकार्य संपल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, बसला आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आग लागल्यानंतर बसमधून फटाक्यांसारखे आवाज ऐकू येत होते. प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

कॉकरोच जनता पक्ष आक्रमक, निवडणूक आयुक्त ज्ञानेश नवं टार्गेट, आंदोलनाची घोषणा करणार?

आगीमुळे मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. त्यामुळे पोलीस बसच्या तिकीट बुकिंगमधील माहितीद्वारे प्रवाशांच्या नातेवाईकांशी संपर्क साधत आहेत. मृतांची ओळख निश्चित करण्यासाठी नातेवाईकांचे डीएनए नमुने घेऊन ते मृतदेहांच्या नमुन्यांशी जुळवले जाणार आहेत. त्यानंतर मृतांची अधिकृत ओळख पटवली जाईल.

Exit mobile version