चॅटजीपीटी वापरताना पकडला; IIT विद्यार्थ्याने संपवलं जीवन, विद्यार्थ्यांचं प्रशासनाविरोधात आंदोलन!

IIT Powai Student Dies चॅटजीपीटी वापरून कॉपी केल्याच्या आरोपानंतर आयआयटी पवईतील विद्यार्थ्याने जीवन संपवले.

IIT Powai Student

IIT Powai Student

IIT Powai Student Dies Over ChatGPT Cheating Row: आयआयटी पवईमध्ये (IIT Pawai) शुक्रवारी (18 सप्टेंबर) एक घटना घडली. येथील एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने कॅम्पसमधील वसतिगृहात गळफास घेतला. साहिल वाकोडे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर कॅम्पसमधील विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात निदर्शने सुरु केली. या घटनेनंतर कॅम्पसच्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे.

तिरुपती लाडूसाठीच्या तुपात पाम ऑइल, पामोलिन आणि रसायनांची भेसळ; EDकडून कंपनीच्या प्रवर्तकाला अटक

आयआयटी प्रशासनाच्या मते, साहिलने परीक्षेदरम्यान उत्तरे शोधण्यासाठी चॅटजीपीटीचा वापर केला. त्यावेळी त्याला कॉपी करताना पकडण्यात आले होते. या प्रकरणानंतर साहिलचे समुपदेशन करण्यात आले होते आणि त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, कॉपी केल्याच्या आरोपानंतर साहिलला एक वर्षासाठी निलंबित करण्याची तसेच वसतिगृहातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याचे शिक्षण वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती त्याला वाटत होती. या परिस्थितीमुळे तो मानसिक दबावाखाली होता आणि त्यातूनच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBI नियमभंगाची कारवाई; बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आयआयटी पवईतील प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. मागील वर्षभरात कॅम्पसमध्ये आत्महत्येच्या घटना घडूनही प्रशासनाकडून कोणाचीही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच आयआयटी पवईचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांच्या राजीनाम्याची मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रा. केदारे यांनी संपूर्ण घटनाक्रमाची नैतिक जबाबदारी आपली असल्याचे म्हटले. तसेच या प्रकरणात पूर्ण उत्तरदायित्व निश्चित केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, राजीनाम्याच्या मागणीबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.

भारतावर 100% टॅरिफचा धोका! ट्रम्प यांची नव्या कायद्यावर स्वाक्षरी; रशियन तेल खरेदीचा फटका?

तर, मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्तात्रय नलावडे यांनी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर तणावाचे वातावरण असल्याचे सांगितले. मात्र, आयआयटी प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद सुरू असून चर्चेच्या माध्यमातून परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version