रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार; खरातसोबत गुवाहाटी दौरा केल्याचं उघड

याच प्रकरणात खरात सोबत असलेल्या जवळीकतेमुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला.

News Photo   2026 05 13T213529.388

रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार; खरातसोबत गुवाहाटी दौरा केल्याचं हॉटेल डिटेल्समध्ये उघड

महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Chakankar) यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याच चित्र आहे. अशोक खरात याचे उद्योग समोर आल्यानंतर आपला काहीही संबंध नाही, असं म्हणणाऱ्या चाकणकर यांचं गुवाहाटी कनेक्शन समोर आलं आहे. गुवाहाटीला अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकर यांनी दौरा केला असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्या दौऱ्यात सहभागी होत्या.

गुवाहाटीच्या हॉटेल ब्लू रॅडिसन येथे तिघांनीही तीन दिवस मुक्काम केला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे खरात प्रकरणातच आर्थिक अफरातफरीचा आरोप ठेवून चाकणकर यांना ईडीने उद्या (गुरूवारी) चौकशीसाठी बोलावले आहे. त्याआधी त्यांचा खरातसोबत गुवाहाटी दौरा समोर आल्याने चाकणकर चहूबाजूंनी अडकल्याचे बोलले जाते. अशोक खरात याच्या नाशिकच्या मिरगावातील काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. श्रीमंत भक्तांना भुलवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळून, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा कारनामे त्याने केले. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

अशोक खरात विरोधात १७ गुन्हे; लवकरच सर्व प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल होणार

याच प्रकरणात खरात सोबत असलेल्या जवळीकतेमुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. खरातसोबत आपले थेट संबंध नव्हते, त्यांना केवळ आध्यामिक गुरू मानत होते, असे सांगून रुपाली चाकणकर यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला. परंतु खरात याची दीड महिना चौकशी करून एसआयटीने चाकणकर यांनाही चौकशीसाठी पाचारण केल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. आता खरातसोबतच्या गुवाहाटी दौऱ्याने त्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे.

भोंदू अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांनी २०२१ मध्ये गुवाहाटी दौरा केला होता. भोंदू खरात याच्यासोबत आपला काहीच संबंध नाही म्हणणाऱ्या रूपाली चाकणकर आणि त्यांच्या बहिण प्रतिभा चाकणकर यांनी सोबत दौरा केल्याने आणि गुवाहाटीमध्ये मुक्काम केल्याने त्यांच्यातील जवळीकता यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

विशेष म्हणजे गुवाहाटीच्या रेडीसन ब्लू हॅाटेलमध्ये एकाच तारखांना तिघेही वास्तव्यास होते. २८ ॲागस्ट २०२१ ते ३० ॲागस्ट २०२१ या तारखांना हे तिघेही रेडीसन ब्लू या हॅाटेलमध्ये वास्तव्यास होते. या तारखांमध्ये त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन पूजा अर्जा केल्याची शक्यता आहे. अशोक खरात भक्तांकडून लाखो रुपये घेऊन ज्या पूजा अर्चा करायचा, तशीच पूजा अर्चा गुवाहाटीमध्ये केल्याची चर्चा आहे.

Exit mobile version