नाशिकनंतर NEET पेपर फुटीप्रकरणात पुणे कनेक्शन समोर; 15 लाखात विकला पेपर?
NEET Paper Leak : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा नाशिक
NEET Paper Leak : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा नाशिक पोलिसांकडून सीबीआयने घेतला असून सीबीआयकडून शुभमची चौकशी सुरु करण्यात आली आहे. तर आता समोर आलेल्या माहितीनुसार, सीबीआय शुभमला मुंबईकडे घेऊन रवाना झाली असून शुभम आणि पुण्यात राहणारा धनंजय याने हे पेपर लीक करण्याचा कट रचला असं सांगण्यात येत आहे. धनंजयने नीटचा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला आणि यानंतर शुभमने टेलिग्रामद्वारे पेपर पुढे 15 लाख रुपयांना विकला असं देखील सांगण्यात येत आहे.
तर दुसरीकडे पेपर फुटीप्रकरणात (NEET Paper Leak) आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. शुभमने तो पेपर हरियाणाला पाठवल्याचे देखील सीबीआय तपासात उघड झाले असल्याचा दावा मीडिया अहवालात करण्यात येत आहे. माहितीनुसार, शुभम आणि धनंजयने यापूर्वी नीटचा पेपर काही ग्रुप्समध्ये फॉरवर्ड केला होता जो लीक झाला होता आणि अंदाजे 80 टक्के अचूक होता.
तर या प्रकरणात एसओजीने (SOG) कथितरित्या फुटलेल्या नमुना प्रश्नपत्रिका मिळालेल्या 150 विद्यार्थी आणि 70 पालकांची यादी सीबीआयकडे (CBI) दिली आहे. तसेच एसओजीच्या ताब्यात असलेल्या 13 एमबीबीएस समुपदेशकांनाही सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे. माहितीनुसार, संशयित आरोपी शुभमने 10 लाख रुपये मोजून प्रश्नपत्रिका मिळवली होती आणि पुढे हीच प्रश्नपत्रिका 15 लाख रुपयांना विकली. यानंतर ही प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर पसरली होती.
अखिलेश यादव यांचे बंधू प्रतीक यादव यांचं निधन ; वयाच्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे कनेक्शन समोर
या प्रकरणात नाशिकपासून सुरु झालेला तपास आता पुण्यापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. शुभमचा एक साथीदार पुण्यात असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध देखील सुरु केला आहे. माहितीनुसार, संबंधित तरुण हा मूळचा अहिल्यानगर येथील असल्याची देखील माहिती समोर आली आहे.