ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यांच्याकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. आज सकाळपासून त्यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु होती. 9 तासांपासून सुरु असलेली ही चौकशी ही चौकशी अखेर संपली आहे. थोड्यावेळापूर्वीच जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले आहेत. त्यांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा पण… Jayant Patil यांच्या ED चौकशीवर पवार बोलले
जयंत पाटील म्हणाले, आता ईडीकडे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील, तरीही मला पुन्हा बोलवलं तर मी चौकशीला जाणार आहे. माझ्या आयुष्यात आयएल आणि एफएस कंपनीशी किंवा कंपनीशी संबंधित माणसांशी संबंध आला नाही. मी ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलं आहे.
RBI : काय आहे Clean Note Policy? याच धोरणामुळे RBI ने 2000 रुपयांच्या नोटा घेतल्या परत
तसेच आज चौकशीदरम्यानच्या 9 तासांमध्ये ‘शिवकालीन महाराष्ट्र’ हे पुस्तक पूर्ण वाचून झालं असून ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला चांगली वागणूक दिली आहे. चौकशीमध्ये मला जे प्रश्न विचारले होते त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरे दिली आहेत. मी काहीही चुकीचं केलेलं नाही तरीही आपल्याला ही लढाई लढावीच लागणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
जे कार्यकर्ते, नेते माझ्यासाठी कार्यलयाबाहेर आले होते त्यांचे जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.विशेषत: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आज सकाळपासूनच ईडीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसले होते. आव्हाड यांच्यासह राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्याचेही त्यांनी आभार मानले आहेत.
अतिक अहमदची हत्या अन् लॉरेन्स बिन्शोई गँगचे कनेक्शन उघड; हल्लेखोरांची NIA समोर कबुली
ईडीच्या नोटीशीनंतर आज जयंत पाटील ईडी कार्यालयात जाणार असल्याची माहिती मिळताच राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मुंबईतील प्रदेश कार्यालयात एकच गर्दी केली होती. कार्यकर्त्यांची हीच गर्दी नंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून बसली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलनही करण्यात आलं.
ईडीच्या कार्यालयाबाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत येत होता. माझ्यासाठी आल्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार, या शब्दांत जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांचे आभारही मानले आहेत. दरम्यान, आयएल आणि एफएस प्रकरणी त्यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
जयंत पाटील ईडीच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हा ते हसरा चेहरा घेऊन बाहेर आल्याचं पाहताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करत समर्थनात घोषणाबाजी देखील केली आहे.