Sharad Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास राष्ट्रवादीची तयारी नाही” : पाटलांच्या ED चौकशीवर पवारांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने समन्य पाठवले होते. त्यानुसार पाटील आज ईडी कार्यालयात हजर झाले. पाटील यांच्या चौकशी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे.
लोकसभेच्या जागावाटपावर शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता आहे, सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून यामध्ये आम्हाला होतील त्या यातना सहन करण्यास आम्ही तयार असल्याचं शरद पवारांनी ठणकावून सांगितलं आहे. तसेच राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, जयंत पाटील(Jayant Patil ED Notice) यांना आयएल आणि एफएस प्रकरणी ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले.
Anil Deshmukh यांनी चौदा महिन्यांच्या जेलवारीनंतर मिळवला मोठा विजय
जयंत पाटलांना आलेल्या नोटीसीबद्दल मला पूर्ण माहिती नसून चुकीचे काम करणाऱ्यांना सरकारडून संरक्षण दिलं जात पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांना त्रास देण्याच काम सुरु असल्याच आरोप शरद पवारांनी केला आहे.
तसेच राष्ट्रवादीच्या 9 ते 10 नेत्यांना आत्तापर्यंत ईडीने समन्स बजावलेले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही ईडीने काही एक कारण नसताना 14 महिने तुरुंगात ठेवलं आहे. देशमुखांनी एका शैक्षणिक संस्थेसाठी 100 कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला पण आरोपपत्र दाखल केलं तेव्हा 20 कोटींचा उल्लेख करण्यात आला. त्यांच्यावर अतिरंजित आरोप करण्यात आले होते.
BJP विरोधात जनमत तयार झाल्यावर ‘लहरी राजा’ उलटेसुलटे निर्णय घेतो, नोटबंदीवरून राऊतांची टीका
सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अपेक्षा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत नाही. सत्ताधाऱ्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची आमची तयारी नसून यामध्ये आम्हाला होतील त्या यातना सहन करण्यास आम्ही तयार असल्याचं शरद पवारांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे.
जयंत पाटील सकाळी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले असून काही कागदपत्रे न आणल्याने अद्यापही त्यांची चौकशी सुरुच आहे. ईडीच्या कार्यालयात दाखल होणार असल्याने जयंत पाटलांच्या समर्थनात राज्यातील अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.