जसं ‘लष्कर-ए-तोयबा’ तसं ‘लष्कर-ए-उत्सव’ झालाय; बापटांचं सणसणीत उत्तर

Lashkar-e-Utsav’ डीजेवाल्यांना आणि गणेशोत्सावात डीजे लावणाऱ्या गणेशमंडळांना बापटांनी चांगलेच सुनावले, म्हणाले; हा लष्कर-ए-उत्सव आहे.

Lashkar-e-Utsav

Lashkar-e-Utsav

‘Lashkar-e-Utsav’: Vidyanand Bapat Takes Dig at DJ Culture: पुण्यात गणेशोत्सवानिमित्त डीजे आणि ध्वनीप्रदुषणाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना काल (3 सप्टेंबर) मारहाण झाली. त्यानंतरही त्यांनी ध्वनीप्रदुषणाचा मुद्दा अजून लावून धरला. त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका ठासून मांडली. त्यांनी डीजेवाल्यांना आणि गणेशोत्सावात डीजे लावणाऱ्या गणेशमंडळांना चांगलेच सुनावले, तसेच लोकांना या सणांचा जबरदस्तीने त्रास दिला जातो, असेही ते म्हणाले.

ओबीसींच्या पाठिंब्याची जाणीव ठेवा! छगन भुजबळ मैदानात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सुनावलं

डीजेवर बंदी लावली तर डीजेवाल्यांचा रोजगार बंद होईल, असा दावा करणाऱ्यांना बापटांनी तार्किक उत्तर दिलं. याबाबत बोलताना त्यांनी अंडरवर्ल्डचा संदर्भ दिला. ते म्हणाले, पुर्वी मुंबईत अंडरवर्ल्ड खुप सक्रिय होते. ते लोकांकडून खंडणी घ्यायचे, पैशांसाठी खुन करायचे. गुन्हेगारांना सुपारी दिली जायची. मग पोलिसांनी ते सर्व बंद केले. आता जर अंडरवर्ल्ड आणि गँगस्टर लोकांनी म्हटलं की, आमचा हा रोजगार आहे. तो बंद करु नका, तर चालेल का?

नांगरे पाटलांचे घूमजाव, नागपुरात सरसकट DJ बंदी नाहीच

अगदी तसंच डीजेचं आहे. अंडरवर्ल्ड हे हार्ड व्हायलेंस आहे. तर डीजे हा सॉफ्ट व्हायलेंस आहे. ज्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो, असं तार्कीक उत्तर विद्यानंद बापटांनी दिलं.

महापुराच्या तडाख्यात गावं वाहून गेली; एक घर मात्र खंबीरपणे कसं उभं राहिलं?, कारण आलं समोर

गणेशोत्सावात डीजे लावल्याने ध्वनीप्रदुषण होते. यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. लोकं डीजेच्या दणदणाटामुळे घरं सोडून जातात. हे त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेले आहे. या डीजेचा दणदणाट असलेल्या उत्सावाला आता ‘लष्करे-ए-तोयबा’ सारखे स्परुप आले असून तो ‘लष्कर-ए-उत्सव’ झाला आहे. असा सणसणीत टोला बापटांनी लगावला आहे. आता डीजेवाल्यांनी दुसरा एखादा उद्योग, व्यवसाय शोधावा. रोजगार बंद होतोय अशी कारणे देऊ नये, असे बापट म्हणाले आहेत.

Exit mobile version