“डीजे हा सॉफ्ट व्हायलन्स, डीजेवाल्यांनी दुसरा उद्योग शोधावा; विद्यानंद बापटांचं डीजेवाल्यांना थेट उत्तर

Vidyanand Bapat Targets DJ नागरिकांना त्रास देणारा व्यवसाय टिकता कामा नये, डीजे व्यावसायिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरही बापटांनी भाष्य केले.

Vidyanand Bapat Targets DJ Culture

Vidyanand Bapat Targets DJ Culture and Festival Noise: गणेशोत्सवातील डीजे, ध्वनीप्रदूषण आणि मिरवणुकांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यानंद बापट यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेतून आक्रमक भूमिका मांडली आहे. नागरिकांना त्रास देणारा व्यवसाय टिकता कामा नये, असे म्हणत त्यांनी डीजे व्यावसायिकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरही भाष्य केले. “डीजे हा सॉफ्ट व्हायलन्स आहे. डीजे बंद झाला तर दुसरा उद्योग सुरू करा,” असे बापट यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

‘महाराष्ट्राची वाघीण’ आयुष्याचा डाव हरली! राष्ट्रीय कुस्तीपटूची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

नागरिकांना त्रास देणारा व्यवसाय कधीच टिकला नाही पाहीजे

डीजेबंदीमुळे डीजेवाल्यांचा रोजगार हिरावला जात असल्याचा दावा हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मुंबईतील अंडरवर्ल्डचे उदाहरण दिले. ‘रोजगार गेला’ हा हास्यास्पद दावा आहे. मुंबईमध्ये एकेकाळी अंडरवर्ल्ड खुप होतं. अनेक गँगस्टर लोकांकडून खंडणी घ्यायचे, पैशासाठी खुन करायचे. जर अंडरवर्ल्डचे लोकं, गँगस्टर म्हणाले असते की, आमचा हा रोजगार आहे. यावर बंदी आणू नका, तर ते चालेल का? तसेच डीजे हा सॉफ्ट व्हायलेंस आहे. डीजे बंद झाला तर दुसरा उद्योग सुरु करा. नागरिकांना त्रास देणारा व्यवसाय कधीच टिकला नाही पाहीजे. एखादा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांनी त्याला ‘रोजगार’ म्हटल्याने तो सुरू ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

शहराबाहेर मिरवणूक काढा

गणेश मिरवणुकांबाबत बोलताना बापट यांनी ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. “ध्वनीप्रदूषण तुम्ही काढून टाकले, तर स्वतःहून मिरवणुका रद्द होतील. सोलापुरातही असेच झाले आहे. मिरवणूक काढायची असेल तर ती शहराबाहेर काढावी,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

विद्यानंद बापटांना शरद पवारांचं समर्थन; बापटांवर झालेल्या हल्ल्याचा पवारांनी केला निषेध

जसं लष्करे तोयबा, तसं लष्करे उत्सव

दरम्यान, सण-उत्सवांच्या नावाखाली दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा आरोप करत बापट यांनी एक विधान केले. “उत्सवांची दहशत निर्माण झाली आहे. जसं लष्करे तोयबा आहे, तसं लष्करे उत्सव आहे,”असे ते म्हणाले.

मी त्या दिवशी जिवंत राहिलो तर …

तुमच्या समर्थनार्थ पुणेकरांनी रविवारी काढलेल्या मोर्चात सामिल होणार का? असा प्रश्न विचारल्यावर बापट म्हणाले की, माझं पुढे काय होईल हे सांगता येत नाही. नरेंद्र दाभोलकरदेखील सकाळी नेहमीसारखेच मॉर्निंग वॉकला निघाले होते. रविवारी (6 सप्टेंबर) पुणेकरांनी माझ्या समर्थनार्थ मोर्चा काढला आहे. पण मी त्या दिवशी जिवंत राहिलो, तरच त्या मोर्चात सहभागी होईन.

सोलापुरात डीजेबंदी; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धर्माच्या भावना दुखावल्या…

धर्माच्या भावना दुखावल्याच्या आरोपांवरही बापट यांनी टीका केली. “धर्माच्या भावना म्हणजे छाती, डोकं किंवा पोट नव्हे, जे दुखायला लागतील. ‘भावना दुखल्या’ हा हास्यास्पद कांगावा आहे. तार्किक प्रतिवाद करता येत नसल्यामुळे लहान मुलांसारखा कांगावा केला जातो,” असे त्यांनी म्हटले. तसेच “अनेकांना सणांच्या नावावर वाटेल तो धुडगूस घालायचा आहे. त्यांना सण-उत्सवांचे काही देणेघेणे नाही,” असेही त्यांनी सांगितले.

आपल्यावर दबाव आणला जात आहे का?

याबाबत बोलताना बापट यांनी आपल्याला पोलिस संरक्षण मिळाल्याचे सांगितले. “माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पोलिसांनी दबाव आणलेला नाही. उलट सार्वजनिक ठिकाणी मुलाखती देणे टाळा, असे मला सांगण्यात आले,” असे त्यांनी स्पष्ट केले.

देशात सार्वत्रिक शस्त्राधिकार असावा

स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याबाबत विचारले असता त्यांनी देशात सार्वत्रिक शस्त्राधिकार असावा, असे मत व्यक्त केले. “कोयता गँगसारखे नाही; पण कन्सिल्ड कॅरी असावे,” असे ते म्हणाले.

मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावणाऱ्या रमाबाईंची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल; 1 लाखाचं सहाय्य

दरम्यान, डीजेबंदीच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, “लोकांनी मिळून निर्णय घेतला तर कोणतीही समस्या सुटू शकते. त्यासाठी कोणाला भेटण्याची गरज नाही,” असे बापट यांनी सांगितले. तसेच, “मी उभी केलेली चळवळ लोकं त्यांच्या परीने पुढे घेऊन जातील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

follow us