‘मलाही अशोक खरातने चिंचोके आणि ओश्नो जल दिले होते, मग मी…’; अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी सांगितला ‘तो’ प्रसंग!

Maharashtra Epstein File Movie: 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल'च्या प्रदर्शनाला विलंब; स्क्रीनिंग न झाल्यास दिपाली सय्यद यांचा आंदोलनाचा इशारा!

Maharashtra Epstein File Movie Dipali Sayyed

Maharashtra Epstein File Movie Dipali Sayyed

Maharashtra Epstein File Movie Dipali Sayyed: कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या बहुचर्चित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र, सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने प्रदर्शन लांबणीवर पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी सेन्सॉर बोर्डावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी केला आहे. 22 नोव्हेंबरला चित्रपटाचे स्क्रीनिंग होणार असून, ते न झाल्यास सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच एकदा अशोक खरातने मलाही चिंचोके आणि ओश्नो जल दिले होते, असे त्यांनी सांगितले.

गोकुळपाठोपाठ वारणा दूध संघाचीही दरवाढ; म्हशीच्या दुधासाठी आता मोजावे लागणार 78 रुपये!

सेन्सॉर बोर्डावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप

दिपाली सय्यद यांनी सांगितले की, चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी सेन्सॉर बोर्डाकडून तारीख मिळण्यात अडचणी येत आहेत. चित्रपट पूर्ण झाल्यापासून अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. यापूर्वीही न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता सेन्सॉर प्रमाणपत्राच्या टप्प्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. 22 नोव्हेंबरपर्यंत स्क्रीनिंगची वाट पाहणार आहोत. त्यानंतरही स्क्रीनिंग झाले नाही, तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

संविधान म्हणजे फसवणूक, ढोंग आणि थट्टा; भारतात मूठभर बदमाशच खरे शासक, माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांची वादग्रस्त टीका!

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्ड कार्यालयातील सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केल्याचेही सय्यद यांनी सांगितले. चित्रपटाचे स्क्रीनिंग झाल्यानंतरच प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘महाराष्ट्राचं नाव खराब कसं होईल?’

चित्रपटाच्या नावावरून उपस्थित होत असलेल्या आक्षेपांवर बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, महाराष्ट्रात घडलेल्या घटनांवर चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य केल्याने राज्याचे नाव खराब कसे होईल? उलट, राज्याला लागलेला डाग पुसण्यासाठी आणि पुन्हा महिलांचे शोषण होऊ नये, यासाठी अशा विषयांवर चित्रपट येणे गरजेचे आहे. चित्रपटाचे नाव बदलले आणि त्यात ‘एपस्टीन फाईल’ असा उल्लेख राहिला, तरी चित्रपटाचा आशय बदलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘मी रूपाली चाकणकर यांची भूमिका केलेली नाही’

रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या नावावर, वेशभूषेवर किंवा शैलीवरून ट्रेडमार्कचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याबाबतही सय्यद यांनी स्पष्टीकरण दिले. संबंधित ट्रेडमार्कचा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रेडमार्कसाठी 5 नोव्हेंबरला प्रमाणपत्र दाखल करण्यात आले; मात्र त्याआधीच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते, असा दावा त्यांनी केला.

पुण्यात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात तुफान राडा! ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडेंना मारहाण; आरती मारणे यांच्यावर गंभीर आरोप

चित्रपटात आपण रूपाली चाकणकर यांची भूमिका केलेली नसून, त्या काळातील महिला आयोगाच्या अध्यक्षांची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील पात्राचे नाव ‘रूपाली’ नसून ‘चैत्राली’ आहे. एखाद्या राजकीय व्यक्तीची भूमिका साकारली म्हणजे तीच व्यक्ती दाखवली, असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाशी संबंधित विविध राजकीय नेत्यांची पात्रे चित्रपटात पाहायला मिळतील, असेही त्या म्हणाल्या.

“मलाही खरात बाबाने चिंचोके आणि ‘ओश्नो जल’ दिले होते”

अशोक खरात यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना दिपाली सय्यद यांनी सांगितले की, अडीच ते तीन वर्षांपूर्वी खरात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी चिंचोके आणि ‘ओश्नो जल’ दिले होते. मात्र, अशा बाबांवर आपला विश्वास नसल्याने त्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. खरात यांच्याबाबतचे प्रकार समोर आल्यानंतर आपल्यालाही त्यांनी चिंचोके दिल्याचे आठवल्याचे सय्यद यांनी सांगितले.

मोदींच्या आवाहनानंतरही सोन्याचे दर का कोसळले? 30 टक्क्यांची घसरण, नेमकी कारणे काय?

दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आता 22 नोव्हेंबरच्या स्क्रीनिंगकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्क्रीनिंग आणि सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढील तारीख स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version