Maratha Reservation; Maratha Kranti Thok Morcha Opposes Manoj Jarange’s Agitation: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनात आता मतभेद उघड झाले आहेत. मनोज जरांगे पाटील (Monoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला ‘मराठा क्रांती ठोक मोर्चाने’ पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. उलट, जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची दिशाभूल होत असल्याचा आरोप मोर्चाचे राज्य समन्वयक सुनील नागणे (Sunil Nagane) यांनी केला आहे. 50 टक्क्यांच्या घटनात्मक मर्यादेच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर स्वतंत्र आंदोलन उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी
सुनील नागणे यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकांवर टीका केली. मराठा समाजाला ठोस आरक्षण देण्याऐवजी आश्वासनांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत आगामी काळात राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे नागणे यांनी सांगितले.
महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत; सतेज पाटलांचा घणाघात, शक्तीपीठावरूनही सरकारला घेरलं
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. सरकारकडून चर्चेसाठी पाठवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निर्णायक ठरलेली नसल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. मात्र, शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर त्यांनी पाणी पिण्यास आणि सलाईन घेण्यास संमती दिली आहे.
‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
आपल्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी कायम ठेवली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत एक-दोन दिवसांत निर्णय कळवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सरकार आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
11 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करण्याचा अल्टिमेटम
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 11 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. या मुदतीत मागण्या मान्य झाल्यास 11 सप्टेंबरला मुंबईत गुलाल घेऊन येण्याचे आणि 12 सप्टेंबरच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.
16 तासांहून अधिक काम, मोबदला मात्र शून्य; विनावेतन कामात भारत जगात नंबर 1
दरम्यान, प्रकृती साथ देत नसल्याचे सांगत यापुढे उपोषण करणे कठीण असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आता एका बाजूला जरांगे आंदोलनावर ठाम असताना दुसरीकडे मराठा क्रांती ठोक मोर्चाने स्वतंत्र भूमिका घेतल्याने मराठा आरक्षण आंदोलनातील पुढील राजकीय आणि सामाजिक घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
