आता विद्यार्थीही शिकणार आणीबाणीचा इतिहास ; NCERT ने घेतला मोठा निर्णय 

NCERT Class 9 Textbooks :  देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा NCERT चर्चेत असून एनसीईआरटीने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात

NCERT Class 9 Textbooks

NCERT Class 9 Textbooks

NCERT Class 9 Textbooks :  देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा NCERT चर्चेत असून एनसीईआरटीने इयत्ता 9 वीच्या सामाजिक शास्त्र पाठ्यपुस्तकात 1975-77 च्या आणीबाणीवर आधारित अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. Understanding Society: India and Beyond (समाज समजून घेणे: भारत आणि त्यापलीकडे) असे शीर्षक असलेल्या या नवीन पुस्तकात आणीबाणीचे वर्णन भारतीय लोकशाहीसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून करण्यात आले आहे.

एनसीईआरटीच्या (NCERT) या पुस्तकानुसार, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला वाढती बेरोजगारी, महागाई आणि सरकारबद्दलची नाराजी यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. तसेच या काळात लोकनायक जनप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मोठी आंदोलने करण्यात येत होती आणि 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली.

आणीबाणीच्या काळात बहुतेक मूलभूत अधिकार स्थगित करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांवर अनेक निर्बंध लावण्यात आली होती. तसेच अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या काळात लोकशाहीच्या संस्था आणि नागरी स्वातंत्र्याची कसोटी लागली होती असं देखील एनसीईआरटीने या पुस्तकात म्हटले आहे.  एनसीईआरटीने या प्रकरणात आणीबाणीची राजकीय पार्श्वभूमी, जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) यांचे आंदोलन, लोकशाहीवर झालेला परिणाम आणि 1977 च्या निवडणुकांनंतर लोकशाहीची पुनर्स्थापना या मुद्द्यांचा देखील समावेश केला आहे.

भाजप पसंतीनुसार इतिहास मांडते – सचिन पायलट

तर दुसरीकडे एनसीईआरटीच्या या निर्णयाविरोधात विरोधक देखील आता आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा भाजप सत्तेत असते तेव्हा तेव्हा ते आपल्या पसंतीनुसार इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतात अशी टीका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. तसेच आज लोकशाहीसमोर जी आव्हाने आहेत, ती स्वतंत्र भारताच्या इतिहासात अभूतपूर्व आहेत.

मोठी बातमी! नसरापूर बलात्कार हत्या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी-

सोशल मीडियावर, प्रसारमाध्यमांवर, न्यायपालिकांवर, नोकरशाही आणि निवडणूक आयोग यांचा वापर करुन ज्या प्रकारे आवाज दाबला जात आहे असं देखील सचिन पायलट म्हणाले.

Exit mobile version