चैतन्य महाराज वाडेकर यांच्या भावाला बेदम मारहाण, माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मारहाण केल्याचा आरोप

Chaitanya Maharaj Wadekar : मावळ मधील माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे पदाधिकारी नितिन आण्णासाहेब मराठे आणि त्यांच्या परिवाराती

Chaitanya Maharaj Wadekar

Chaitanya Maharaj Wadekar : मावळ मधील माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे पदाधिकारी नितिन आण्णासाहेब मराठे आणि त्यांच्या परिवारातील ज्ञानेश्वर मराठे यांनी अनेकांना सोबत घेऊन चैतन्य महाराज वाडेकर (Chaitanya Maharaj Wadekar) यांच्या अपंग भावाला जीवघेणी मारहाण केल्याचा आरोप अमोल वाडेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाने अलॅाट केलेल्या वराळे गावातील एक एकर जागेचा ताबा, महसूल अधिकाऱ्यांकडून अधिकृत कुलमुख्त्यारधारक अमोल वाडेकर यांच्याकडे पोलीस बंदोबस्तात सोपवण्यात आला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून माजी जिल्हा परिषद सदस्य नितिन आण्णासाहेब मराठे व इतरांनी एका पायाने अपंग असलेल्या चैतन्य महाराजांचे भाऊ अमोल वाडेकर यांना जीवघेणी मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीवर बंदी, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यगृहांसाठी नवीन आदेश; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

सदर बाब मावळचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांच्या समोर देखील मांडण्यात आली होती. आमदार सुनिल शेळके यांनी कागदपत्रे तपासून मराठे परिवाराला संबंधित शासकीय कामात अडथळा न करण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या . तरीही संबंधितांनी खोटे आरोप करत शासकीय अधिकाऱ्यांनी नियमाप्रमाणे ताबा देऊनही आज मारहाण केली असल्याच वाडेकर यांचं म्हणणं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

follow us