माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा, भर चौकात तुमची माफी मागेन; सुनिल शेळकेंचं विरोधकांना आव्हान
Sunil Shelke News : विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच पुण्यातील मावळ तालुक्याचे (Mawal Assembly Constituency) विद्यमान आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी विरोधकांना आव्हान दिलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनिल शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा, भर चौकात तुमची माफी मागेन, पण खोटे आरोप करु नका, असं खुलं आव्हान सुनिल शेळके यांनी विरोधकांना दिलंय. दरम्यान, शेळके यांनी आज महायुतीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलायं. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, जोरदार शक्तिप्रदर्शन करणार
सुनिल शेळके म्हणाले, मी मतदारसंघात जे काय केलं असेल ते मागून नाही तर पुढे येऊन सांगावं. माझ्यावर पुराव्यानिशी आरोप करा याच चौकात येऊन तुमची माफी मागेन पण खोटे आरोप करु नका. आज आमच्यात भांडणे लावण्याचं काम काही लोकांनी केलं, शेवटी राजकारण आहे, या शब्दांत शेळकेंनी विरोधकांचा समाचार घेतलायं.
तसेच मी दीड वर्षांपूर्वी विचारलं होतं की तुम्हाला विधानसभा लढवायची का? त्यावर ते म्हणाले नको मला निवडणूक नाही लढवायची. तेव्हा विधानपरिषद द्या म्हणाले पण विधानपरिषद न मिळाल्याने शेवटी महामंडळ दिलं. महामंडळ देत होतो तेव्हा दोन कलाकारांनी नको घेऊ म्हणून सांगितलं. महामंडळ घेऊ नको, आम्ही पक्षाचे राजीनामे देतो. त्यांनी काल राजीनामेही दिले पण पक्षाचे नाही तर लाभाचे राजीनामे दिले आहेत, ते खरंच स्वाभिमानी असतील तर त्यांनी पक्षाचे राजीनामे द्यावेत, असा घणाघात सुनिल शेळकेंनी केलायं.
झारखंडमध्ये बदललाय घराणेशाहीचा ट्रेंड; मुलगा नाही तर सूना सांभाळताहेत राजकीय वारसा
गणेश भेगडे तुम्ही महायुतीच्या दुधात मिठाचा खडा टाकू नका…
गणेश भेगडे तुम्ही महायुतीच्या दुधात मिठाचा खडा टाकू नका, तुमचा स्वार्थ तुमच्यापाशी ठेवा माझा स्वार्थ मी माझ्यापाशी ठेवतो. तुम्ही माझा 2006 पासूनचा इतिहास सांगत आहात,, पण मी तुमचा 1999 पासूनचा इतिहास सांगेन. तुम्ही कसे पडले काय झाले ते. आपला संघर्ष हा वैचारिक ठेवा सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम करु नका, असंही सुनिल शेळके म्हणाले आहेत.
भेगडेंचा अन् माझा कॉन्टॅक्टचा संघर्ष…
मागील तीन वर्षांत गणेश भेगडे कधी बोलला नाही की, तुम्ही अन्याय केला. मागील 15 दिवसांतच बोलतोयं की अन्याय झालायं. मी याला कॉन्ट्रॅक्ट दिलं नाही हा त्याच्यावर अऩ्याय झालायं. माझ्याकडे ते एका कंपनीची फ्रॅन्चाईजी मागत होते, त्यानंतर ह्यूंदाई कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मागत होते या कंपनीचं कॉन्ट्र्रॅक्ट ज्याने दिलं त्याचा झेंडा घेऊन तो फिरतोयं, त्याचा आणि माझा संघर्ष फक्त कॉन्ट्रॅक्टचा होता, असं शेळकेंनी स्पष्ट केलंय.