विधान परिषद निवडणुकीत लंके यांची एंट्री., राष्ट्रवादीकडून उमेदवारी, आघाडीत बिघाडी? तनपुरे यांना पुन्हा शह?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

News Photo   2026 05 31T200702.408

विधान परिषद निवडणुकीत लंके यांची एंट्री., राष्ट्रवादीकडून उमेदवारी, आघाडीत बिघाडी? तनपुरे यांना पुन्हा शह?

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (NCP) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना महायुतीची उमेदवारीही मिळाली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा खेळी खेळण्यात आली आहे. पक्षाने खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उद्या माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई निलेश लंके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिली आहे.

राहुरी पोटनिवडणुकीत तनपुरे यांनी लढण्यास नकार दिला होता, त्यावेळी राष्ट्रवादीने असेच ऐनवेळी गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा तोच डाव टाकण्यात येत असल्याचे दिसून येते.

मात्र यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार आहे. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पूर्वीच सांगितले आहे. त्यानुसार करण ससाणे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ससाणे आणि पर्याय म्हणून दीप चव्हाण यांना सोबत घेत तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येते.

इकडे महायुतीमध्येही सगळे काही अलबेल नाही. काल प्रवेश केल्यानंतर तनपुरे उद्या अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तनपुरे यांचा भाजप प्रवेश जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना आवडलेला दिसत नाहीत. सोशल मीडियातून हा विरोध प्रकट होत आहे.

महायुतीचा विधान परिषद निवडणुकीसाठीचा फॉर्म्युला ठरला; भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार
तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्या अपक्ष उमेदवारीसाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार तयारी केली आहे. ही जागा जगताप यांचे वडील अरुणकाका जगताप यांनी दोनदा जिंकली होती. त्यामुळे यावर जगताप कुटुंबियांचा पाहिला दावा ठरतो, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.त्यामुळे उद्या बरेच अर्ज दाखल होतील. ४ जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. पक्षा सोबतच आर्थिक निकष महत्वाचा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत यावेळी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेची निवडणुकीत झालेली नसल्याने ते ७५ आणि १४ पंचायत समिती सभापती एवढे मतदार कमी आहेत. ४६१ अशा नेहमीपेक्षा कमी मतदार असलेली ही निवडणूक आहे. खूप वर्षांनी ती होत असल्याने चुरस अपेक्षितच आहे.

Exit mobile version