‘प्रदीप पुर्णेकरांचा आवाज वाढला अन् त्यांची हत्या केली’; संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder: ठाण्यात प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येनंतर संजय राऊत यांनी शिंदे गट आणि गृहखात्यावर गंभीर आरोप केलेत.

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder: ठाण्यात ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर (Pradeep Purnekar) यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट आणि गृहखात्यावर जोरदार टीका केली. ठाण्यात सातत्याने हत्या आणि गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचा दावा करत राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर थेट सवाल उपस्थित केले.

दिवाळीतील फटाक्यांवर निर्बंध कायम राहणार? CPCB कडून 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल

“या राज्याच्या गृहमंत्र्यांचा कारभार लज्जास्पद आहे. त्यांना प्रश्न विचारला की ते दहा वर्षांपूर्वीचे आकडे सांगतात. ठाण्यात एका महिन्यात पाच जणांच्या हत्या झाल्या आहेत. 25 सप्टेंबरला गस्तीवर असताना वागळे इस्टेटमध्ये पोलीस अधिकारी किसन भोईर यांची हत्या झाली आणि आता पुर्णेकरांची हत्या झाली. हत्यांची मालिका सुरू आहे. गृहखातं काय करतंय? ठाण्याचे पोलीस आयुक्त काय करत आहेत? ठाण्यापर्यंत गृहखात्याची रेंज पोहोचत नाही का?” असा सवाल राऊत यांनी केला.

फडणवीस यांच्या नकाशावर ठाणेच येत नाही, अशी टीका करत राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लज्जास्पद गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद होईल, असंही ते म्हणाले.

इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींचा पारा चढला; ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप

दरम्यान, प्रदीप पुर्णेकर यांच्या राजकीय संघर्षाचा संदर्भ देताना राऊत यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांचं नाव घेतलं. पुर्णेकर आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात राजकीय संघर्ष होता. पुर्णेकरांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता, असं राऊत यांनी सांगितलं. तसेच मनोरमानगर परिसरात बिल्डरांच्या माध्यमातून नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत पुर्णेकर त्याविरोधात लढत होते. क्लस्टरच्या मुद्द्यावरही त्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती, असा दावा राऊत यांनी केला.

प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला नवे वळण, माझ्या वडिलांच्या हत्येचा कट आधीच रचला होता, राम पूर्णेकरांचा गंभीर आरोप

मनोरमानगर परिसरावर ड्रग्स रॅकेटर्सचा प्रभाव असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. या रॅकेटला शिंदे गटातील काही लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा करत पुर्णेकर यांनी त्याविरोधातही सातत्याने आवाज उठवला आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, असं राऊत म्हणाले. मनोरमानगरमधील लोकांना बिल्डरांसाठी बेघर करण्याच्या कथित प्रयत्नांविरोधात पुर्णेकर लढत होते आणि त्यांचा आवाज नागरिकांपर्यंत पोहोचू लागला होता. त्यानंतरच त्यांची हत्या करण्यात आल्याचा दावा राऊत यांनी केला.

सांगली जिल्हा बँकेच्या मैदानात पडळकर उतरले; जयंत पाटलांविरोधातील घोषणाबाजीने वातावरण तापलं

पुर्णेकर यांच्या हत्येवरून राऊत यांनी थेट शिंदे गटावरही गंभीर आरोप केले. “एका कार्यकर्त्याची रात्री गोळ्या झाडून हत्या होते, ही गंभीर गोष्ट आहे. फडणवीस यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. प्रदीप पुर्णेकरांवर गोळ्या झाडणाऱ्यांच्या पाठीमागचे खरे सूत्रधार शिंदे गटामध्ये आहेत. या सूत्रधारांना तातडीने अटक केली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

“ठाणे आज गुंडांचं, अंमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचं आणि बिल्डर लॉबीचं शहर झालं आहे,” असा आरोप करत राऊत यांनी राज्य सरकार आणि गृहखात्यावर पुन्हा निशाणा साधला. दरम्यान पुर्णेकर यांच्या हत्येचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Exit mobile version