Someshwar Factory Election : सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता (Someshwar Factory Election) तिरंगी होण्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलनं 11 आजी-माजी संचालकांना पुन्हा संधी देत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या सत्ताधारी पॅनेलला कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचं निशाण फडकवत लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या माध्यमातुन आव्हान दिलं आहे. जगताप यांच्या पॅनेलमध्ये 5 आजी-माजी संचालकांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत पॅनेलची अंतिम यादी उद्या जाहीर होणार आहे. या पॅनेलचं नेतृत्व युगेंद्र पवार करत असुन त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. सत्ताधारी अजितदादा पवार पॅनेल, पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते पॅनेल आणि युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनेल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणूक तिरंगी; दोन्ही राष्ट्रवादीसह भाजपही मैदानात
श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल
गट 1 – अभिजित सतीशराव काकडे, प्रमोद भगवानराव काकडे, डॉ. वसंतराव रामराव दगडे
गट 2 – विक्रम आनंदराव भोसले, ऋषिकेश शिवाजीराव गायकवाड, राजवर्धन शिवाजीराव शिंदे
गट 3 – रवींद्र जयवंतराव भापकर, मकरंद चंद्रकांत सस्ते, मनिषा आनंदकुमार होळकर
गट 4 – राजेंद्र हरिभाऊ बोरकर, अक्षय धनंजय खलाटे, सुनिल नारायण भगत
गट 5 – सतीश संपत जगताप, सुधाकर ज्ञानोबा टेकवडे, उत्तम महादेव धुमाळ
महिला राखीव – छबुबाई अंकुश नाझीरकर, प्रणिता मनोज खोमणे
एससी/एसटी प्रवर्ग – द्वारकोजी गुलाब साळवे
इतर मागासवर्ग – शैलेश पंढरीनाथ रासकर
भटका विमुक्त – अशोक चंद्रकांत धायगुडे
ब वर्ग – संग्राम तानाजी सोरटे
लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल
गट 1 – महेश काशिनाथ काकडे, संतोष पोपटराव थोपटे, राजेंद्र जगन्नाथ साळुंके
गट 2 – पुरुषोत्तम रामराजे जगताप, सतीश रामचंद्र सकुंडे, वैभव अशोक गायकवाड
गट 3 – अमर आनंदराव होळकर, राहुल दत्तात्रय भापकर, संतोष ज्ञानदेव दरेकर
गट 4 – सचिन जवाहर खलाटे, गोरख बाबुराव खोमणे, अनिल नारायण जगताप
गट 5 – विश्वास लक्ष्मण जगताप, शामराव तुकाराम धुमाळ, अरविंद शिवाजी शेंडकर
महिला राखीव – मंजिरी दीपक निगडे, वंदना संभाजी गरूड
एससी/एसटी प्रवर्ग – मिलिंद बळवंत कांबळे
इतर मागासवर्ग – निलेश हरिभाऊ केदारी
भटका विमुक्त – धनंजय बाबुराव गडदरे
ब वर्ग – महेश महादेव राणे
