“त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे”; सिस्पे घोटाळ्यावरून सुजय विखेंचा निलेश लंकेंना टोला

Sispe Scam सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना कार्यकर्त्यांनी शोधल्याच्या दाव्यावरून सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंवर उपरोधिक शब्दांत टीका केली.

Sispe Scam

Sispe Scam

Sujay Vikhe Patil Takes a Dig at Nilesh Lanke Over Sispe Scam : सिस्पे घोटाळ्यावरून (Sispe Scam) अहिल्यानगरच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. या प्रकरणातील आरोपींना खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढल्याचा दावा खासदार निलेश लंके यांनी केला आहे. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी निलेश लंके यांच्या दाव्यावर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला.

धीरज परदेशी प्रकरणात पोलीस अधीक्षकांचे मोठे विधान; म्हणाले आरोपींना…

निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी सिस्पे घोटाळ्यातील आरोपींचा शोध घेतल्याच्या दाव्याची चर्चा सुरू असतानाच सुजय विखे यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘डॉन’ चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा संदर्भ देत लंके यांच्यावर टीका केली.

“डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, बल्कि नामुमकिन था. पण ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल, तर त्यांना नक्कीच रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे,” असा टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला.

… तेव्हा नागपूरच्या दोन नेत्यांमुळे गोपीनाथ मुंडे करणार होते काँग्रेसमध्ये प्रवेश; पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तपास यंत्रणांपूर्वीच आरोपींचा शोध घेतल्याच्या दाव्यावर विखे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या गुन्ह्याचा किंवा घोटाळ्याचा तपास करण्याचे काम संबंधित तपास यंत्रणांचे असते. मात्र, खासदारांच्या कार्यकर्त्यांनीच आरोपी शोधून काढल्याचा दावा केला जात असेल, तर त्यावर आश्चर्य व्यक्त करण्याची वेळ आली आहे, असा त्यांच्या वक्तव्याचा सूर होता.

याच मुद्द्यावरून विखे यांनी “आता सीबीआय आणि रॉसारख्या तपास यंत्रणांची जबाबदारीही खासदारांकडे सोपवावी लागेल,” अशा उपरोधिक शैलीत लंके यांच्यावर निशाणा साधला.

जरांगेंच्या प्रकृतीबाबत अपडेट; तपासणी अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार

सिस्पे घोटाळ्याच्या मुद्द्यावरून याआधीही लंके आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आरोपींच्या शोधाबाबत केलेल्या दाव्यावरून सुजय विखे यांनी केलेली ही टीका आगामी काळात आणखी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना तोंड फोडण्याची शक्यता आहे.

Exit mobile version