पटेलांनंतर सुनेत्रा पवारही मोदी-शहांच्या भेटीला जाणार, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार?

Sunetra Pawar प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी मोदी शहांची भेट घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.

Sunetra Pawar

Sunetra Pawar

Sunetra Pawar also go Delhi to meet Modi-Shah after Prafull Patel Who will be the national president : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यामध्ये राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ज्यामध्ये एकीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील नेत्यांचा मात्र या चर्चेला विरोध आहे.

पवार सांगताय त्यात तथ्य, आमच्या कानावर कुजबूज… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना सरनाईकांचा दुजोरा

याच दरम्यान अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या चर्चा सुरू आहेत. यात प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी मोदी शहांची भेट घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार देखील दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री केल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रफुल्ल पटेल होतील अशा चर्चा सुरु आहेत. मात्र पटेल यांनी या चर्चा फेटाळल्या आहेत. मग पटेल यांची मोदी शहांशी नेमकी कशासंबंधी बैठक झाली? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार गटाचा मोठा निर्णय, एकाच नेत्याला सर्व अधिकार

त्यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चा यावर प्रफुल्ल पटेल आणि मोदी- शहांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अमित शहा यांनी यामध्ये राजकारण असल्याचे विधान प्रफुल्ल पटेलांसमोर केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी अजित पवारांचे विधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार यांना थेट दिल्लीला येण्याचं निमंत्रण पटेलांकडे दिले आहे.

अजितदादांच्या विमान प्रवासाचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा, अमोल मिटकरींची मागणी

त्यामुळे आता राष्ट्रवादीची सूत्र कुणाच्या हातात जातात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर सुनेत्रा पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या जागी त्यांचे पुत्र पार्थ पवारांना देखील राज्यसभेवर घेण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा सर्व अर्थांनी महत्त्वाचा असणार आहे.

Exit mobile version