जगातील सर्वाधिक नफा कमविणाऱ्या कंपन्या कोणत्या ?

Google: एल्फाबेट ही कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 11 लाख 18 हजार 700 कोटी रुपये नफा कमविते आहे. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

10 Most Profitable Company In Glob

10 Most Profitable Company In Glob

Top 10 Most Profitable Companies Globally: तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वाधिक नफा कमविणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत. त्यात भारतातील किती कंपन्या आहेत. सर्वाधिक नफा कमविणाऱ्या कंपन्या कोणत्या क्षेत्रातील आहेत. हे लेट्सअप मनीमध्ये जाणून घेऊया.

पहिल्या क्रमांकावर गुगल (Google) म्हणजे एल्फाबेट ही कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 11 लाख 18 हजार 700 कोटी रुपये नफा कमविते. तर दुसऱ्या क्रमांकावर अॅपलही कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 10 लाख 8 हजार कोटींचा नफा कमविते. मायक्रोसॉफ्ट ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही कंपनी वर्षाला 9 लाख 44 हजार 100 कोटी रुपये नफा कमविते.

एनव्हिडीया (NVIDIA) ही सेमीकंडक्टर तयार करणारी कंपनी नफा कमविण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. ही कंपनी वर्षाला तब्बल 8 लाख 92 हजार 800 कोटी रुपये नफा कमविते. पाचव्या क्रमांकाला सौदी आरमको (Saudi Armaco) ही कंपनी आहे. ही तेल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 8 लाख 60 हजार 400 कोटी रुपये नफा कमविते.

तर नफा कमविण्यात सहा क्रमांकावर अॅमेझॉन ही कंपनी आहे. या कंपनी आर्थिक वर्षात 6 लाख 88 हजार 500 कोटींचा नफा कमविते. तर सातव्या क्रमांकावर विमा, गुंतवणूक क्षेत्रातील बर्कशायर हॅथवे ही कंपनी आहे. वॉरेन बॅफेट यांच्या नेतृत्वाखालील ही कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला तब्बल 6 लाख 7 हजार 500 कोटी रुपयांचा नफा कमविते. फेसबुक आणि इन्टाग्राम चालवत असलेले मेटा ही कंपनी जगातील आठवी सर्वाधिक नफा कमविणारी कंपनी आहे. ही कंपनी वर्षाला 5 लाख 26 हजार 500 कोटींचा नफा कमिवते.

तर वित्त क्षेत्रातील जेपी मार्गन चेज ही जगातील सर्वाधिक नफा कमविणाऱ्याच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. ही कंपनी वर्षाला 5 लाख 10 हजार 300 कोटी रुपये नफा मिळविते. तर दहा क्रमांकावर टीएसएमसी ही कंपनी आहे. ही तैवानमधील आहेत. ती सेमीकंडक्टर निर्मिती करते. ही कंपनी जगातील सर्वाधिक नफा कमविणाऱ्याच्या यादीत दहावी आहे. ही कंपनीने गेल्या वर्षभरात 4 लाख 54 हजार 500 कोटी रुपये नफा मिळविला आहे.

या यादीत भारतातील एकही कंपनी पहिल्या दहामध्ये नाही. भारतात सर्वाधिक नफा कमविणारी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. ही कंपनीने आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटी रुपये नफा कमविते.

Exit mobile version