High Cholesterol Problem : अनहेल्दी आणि मॉडर्न लाइफस्टाइलमुळे आज अनेक आजारांना निमंत्रण मिळालं आहे. वाढता तणाव, धावपळीचं शेड्युल, आहाराच्या चुकीच्या वेळा, फास्टफुडच वाढलेलं प्रमाण या कारणांमुळे अनेक गंभीर आजार निर्माण झाले आहेत. यातच हाय कोलेस्टेरॉल ही (High Cholesterol) एक समस्या भारतीय लोकांत वेगाने वाढत चालली आहे. या समस्येमागे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली, बाहेरचे जास्त खाणे, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव या गोष्टी कारणीभूत आहेत. आजमितीस तब्बल 31 टक्के भारतीय हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत असा खुलासा नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे. या यादीत केरळ राज्य आघाडीवर आहेत. येथील लोकांत ही समस्या 63 टक्के आहे.
हेल्थियंसद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे की हाय कोलेस्टेरॉलची समस्या युवा वर्गात वेगाने वाढत चालली आहे. बाहेरच्या खाद्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन आणि जास्त तळलेले मसालेदार खाद्य पदार्थ खाल्ल्याने ही समस्या तरुण वर्गात दिसून येत आहे. याच कारणामुळे आज 35 ते 55 या वयोगटातील 35 टक्के लोक हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत.
तज्ज्ञांच्या मते हाय कोलेस्टेरॉल एक लाइफस्टाइल डीसीज आहे. ही समस्या चुकीचा आहार, तणाव आणि इनॲक्टिव लाईफस्टाईल यामुळे निर्माण होते. हाय कोलेस्टेरॉलमुळे शरीरात अनेक आजार उद्भवण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. हार्ट अटॅक (Heart Attack) आणि फॅटी लिव्हर हे दोन विकार यामध्ये प्रमुख आहेत. आज या समस्या देखील वेगाने फैलावत चालल्या आहेत.
सावधान! शारीरिक श्रमाअभावी भारतीय होताहेत आळशी; WHO चा धक्कादायक अहवाल
या अभ्यासानुसार आजमितीस देशातील 31 टक्के लोक हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांत आहे. केरळमध्ये 63%, कर्नाटकात 32%, तेलंगणा आणि महाराष्ट्र 27%, पंजाब 25%, गुजरात 23%, मध्य प्रदेश 22%, हरियाणा 20%, उत्तर प्रदेश आणि दिल्ली 17% आणि बिहार राज्यात 15% लोक हाय कोलेस्टेरॉलच्या समस्येने ग्रस्त आहेत. पुरुष आणि महिलांच्या बाबतीत विचार केला तर दोघांनाही समान रूपाने या समस्येने ग्रासले आहे. म्हणजेच जवळपास 30% महिला आणि तितक्याच प्रमाणात पुरुष या समस्येने ग्रस्त आहेत.
हाय कोलेस्टेरॉल अतिरिक्त फॅट आर्टरिजला ब्लॉक करते. त्यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह बाधित होतो. यामुळे शरीरात हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते. जर या दोन्ही समस्या नियंत्रित केल्या नाहीत तर हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. हार्ट अटॅक, कार्डीयाक अरेस्ट, स्ट्रोक यांसारख्या समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. तसेच याच कोलेस्टेरॉलमुळे लिव्हरवर फॅटी लिव्हरच्या समस्येला जन्म देतो. त्यामुळे लिव्हरच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो तसेच लिव्हर डॅमेज होण्याची शक्यता असते.
सावधान! हृदयविकाराने होताहेत सर्वाधिक मृत्यू; हृदयाचं आरोग्य जपण्यासाठी ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच..
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी संतुलित आहार घ्या. हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात खा. बाहेरचे तळलेले आणि मसालेदार खाद्य पदार्थ खाऊ नका. जंक फूड खाणे सुद्धा टाळा.
मद्यपान करू नका. शारीरिक हालचाल करत राहा. दररोज साधारण अर्धा तास पायी चालत जा. नियमितपणे आरोग्य तपासणी करा.
ताण तणावाचे व्यवस्थापन करा. तणाव कमी करण्यासाठी योग, मेडीटेशन करा. साधारण दोन ते तीन लिटर पाणी नियमितपणे पित जा. दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या.