Download App

भारतात टाटा मोटर्सच्या 5 सर्वात महागड्या कार्स, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

Tata Cars Price : भारतीय ऑटो बाजारात राज्य करणारी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीमध्ये

  • Written By: Last Updated:

Tata Cars Price : भारतीय ऑटो बाजारात राज्य करणारी ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किंमतीमध्ये एकापेक्षा एक शानदार कार्स लॉन्च करत आहे. ग्राहकांना या कार्समध्ये शानदार फीचर्ससह जबरदस्त मायलेज पाहायला मिळत आहे. मात्र तुम्हाला भारतात विक्री होणाऱ्या पाच सर्वात महागड्या कार्सबद्दल माहिती आहे का? जाणून घ्या टाट मोटर्सच्या देशात विक्री होणाऱ्या पाच सर्वात महागड्या कार्सबद्दल सर्वकाही.

Tata Harrier EV

देशात टाटाची सर्वात महागडी इलेक्ट्रिक कार टाटा हॅरिअर ईव्ही आहे. भारतात या कारचा टॉप मॉडेल खरेदीसाठी जवळपास 30 लाख रुपये खर्च करावे लागतात. या कारमध्ये ड्युअल मोटर सेटअपसह येते, जे 158 पीएस पॉवर आणि 238 एनएम टॉर्क जनरेट करते. ते 6.3 सेकंदात 100 चा वेग पकडते. याच बरोबर या कारमध्ये तुम्हाला एकापेक्षा एक मस्त फीचर्स देखील पाहायला मिळणार आहे.

Tata Curve

या यादीत कमी वेळेत भारतीय बाजारात आपली एक वेगळी छाप सोडणारी टाट कर्व्ह देखील आहे. या कारचे टॉप मॉडेल खरेदीसाठी तुम्हाला 19.52 लाख रुपये मोजावे लागतात. या कारमध्ये 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळते. यामध्ये तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही इंजिन मिळतात. तसेच भारतीय बाजारात टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये देखील उपलब्ध आहे.

Tata Punch

टाटा मोटर्सच्या पाच सर्वात महागड्या कार्समध्ये टाटा पंचचा तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो. ही इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात सध्या मोठ्य प्रमाणात विकली जात आहे. भारतीय बाजारात या कारची सुरुवातीची किंमत 10 लाखांपासून सुरु होते तर या कारचा टॉप मॉडेल खरेदीसाठी तुम्हाला जवळपास 15 लाख रुपये मोजावे लागतात. या कारमध्ये पीएसएमएस मोटर मिळते. जी दोन बॅटरी पॅकसह येते. पहिली 25 किलोवॅट प्रति तासाची आहे, 82 पीएस पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करते. दुसरी 35 किलोवॅट प्रति तासाची आहे, जी 122 पीएस पॉवर आणि 190 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

Tata Harrier Kaziranga XZA Plus

तर चौथ्या क्रमांकावर या यादीत टाटा हॅरिअर काझीरंगा एक्सझेडए प्लस आहे. या कारमध्ये 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन मिळते. ते 168 बीएचपी पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करते. ती 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते. लॉन्चच्या वेळी या कारची किंमत 22.24 लाख रुपये होती.

Asia Cup 2025 पूर्वीच एसीसीला धक्का, BCCI ने घेतला मोठा निर्णय, रद्द होणार स्पर्धा?

Tata Nexon

तर टाटा मोटर्सच्या सर्वात महागड्या कारच्या यादीत पाचव्या क्रमांकावर टाटा नेक्सॉनचे नाव आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 8 लाखांपासून सुरु होते तर या कारचा टॉप व्हरेयंट खरेदीसाठी (ऑन-रोड) जवळपास 18.47 लाख रुपये द्यावे लागतात. कंपनीने या कारमध्ये 1.2 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल रेव्होट्रॉन इंजिन दिले आहे, जे 118.27 पीएस पॉवर आणि 170 एनएम टॉर्क जनरेट करते.

follow us